...

7 views

माझा शाळेतील बाक...
चार भितीं मधली शाळा ,
एका बाकावर माझा हिस्सा !
खोडा खोडी गंमत शंमत ,
घडे अनेक विदोनी किस्सा !

रेखाटले असे खूप काही त्यावर,
कधी केली नाही तक्रार!!
वर्गात चले अभ्यासचे तास,
आम्ही झोपी त्यावर गाढ!

वर्गातील मागचा बाक शाळेतला,
खूप काही सांगून चाले!
गंमत मस्ती जुडली बकाशी,
गप्पा गाणी विनोद निराळे!

पूर्ण जग बदलत चाले,
इयत्ता बदलली वर्ग बदलले!
खूप मोठे जालो आम्ही,
नाती बाकाशी जुडून राहिली!
- गौरव देसाई