...

16 views

माझं प्रेम...

माझं प्रेम...


एकदा करून बघावं अस भासलं,
केलं तेव्हाच अमर होऊन बसणारं होत माझं प्रेम...

सदभावणेच्या जोरावर असलेलं,
भावनांच उगम स्थान असणारं होत माझं प्रेम...

अनुभवलेला सुंदर अनुभव खरंच,
अनंत सुखात ढकलणारं होत माझं प्रेम...

क्षितीजाच्या पल्याड आभाळा एवढी मया तिची,
त्यागत एकमेकांच मन जपणारं होत माझं प्रेम...

शहाळ्यासारख बाहेरून कठीण,
आतुन मऊमल ठरणारं होत माझं प्रेम...

मासे वसे पाण्यात पाखरे वसे घरट्यात,
तसे तिच्या माझ्या हृदयात वसणारं होत माझं प्रेम...

मान सन्मान अब्रु सारं जपत गेलोत नेहमी,
तस एकमेकांच्या अस्मितेत वावरणारं होत माझं प्रेम...

मेघ गरजता पाऊस होताच जेव्हा सुरु,
वसंताच्या चिखलमाऱ्यात मळणारं होत माझं प्रेम...

निजूनही निजत तर कधीच नव्हतं,
निद्रेतही स्वप्नांना घडवणारं होत माझं प्रेम...

आभाळ निळं निसर्ग हिरवा हे मात्र लाल,
लाल गुलाब कळ्यांपरी फुलणारं होत माझं प्रेम...

लोकांसाठी निव्वळ आंधळ हे खर,
आम्हांसाठी अंध मात्र कारण बनणारं होत माझं प्रेम...

समीप असो वा असो मैलो दूर आम्ही,
आपापसात मात्र ऋणानुबंध जुळवणारं होत माझं प्रेम...

कवी होण्यास सहज प्रवृत्त केलं हो,
माझ्या कवितेचा आत्मा होऊन रमणारं होत माझं प्रेम...

चंद्र ज्याचा सदा साक्षीदार राहील,
शुक्र ताऱ्यागत लकलकणारं होत माझं प्रेम...

करुणा दयेचा समुद्रच म्हणा,
लाडाने किनाऱ्यांस भिजवणारं होत माझं प्रेम...

वाहत्या नदीचा प्रवाह जणु काही,
खेळत्या पाण्यासारखं खळखळणारं होत माझं प्रेम...

भेट गाठ होयची जेव्हा आमची,
अंगाच्या शहाऱ्यासही लाजवणारं होत माझं प्रेम...

पणतीला साथ वातेची तेलाशिवाय काय जळणार,
सैल थंड वाऱ्यातही पेटणारं होत माझं प्रेम...

काय असत काळा गोरा काय सडपातळ लठ्ठ,
मी क्रुप की सुंदर तुलना न करणारं होत माझं प्रेम...

पुणवेच्या सोजवळ चंद्रालाही लाजवेल,
तारुण्याच्या नजरेत शोभणारं होत माझं प्रेम...

रुसणं फुगणं रोजच असे नसे त्याला खाडा,
गालात रुसूनही लाड पुरवणारं होत माझं प्रेम...

इतके तितके कडु गोड भांडणंही होयचे की आमच्यात,
कमीपणा न दाखवत माघार घेणारं होत माझं प्रेम...

तारेवरच्या कसरती नंतर होयचीच जेव्हा भेट,
त्या मिठीतल्या उबेसाठी किती असुसणारं होत माझं प्रेम...

आठवता ते मिठीत मग्न असलेले क्षण,
आठवणींच्या प्रीतीत न्हाहून जाणारं होत माझं प्रेम...

सुखाच्या दारात असतोच मारा दुखाचा,
काळजीपोटी नेहमीच रडणारं होत माझं प्रेम...

पत्रे,भेटवस्तु निव्वळ दुविधा राहिली मनाची,
गोड काव्याने हसुन सर्व स्वीकारणारं होत माझं प्रेम...

चुकुन चुकल्या गोष्टी घडल्या जेव्हा,
वेळोवेळी डोळे तानुन टोकणारं होत माझं प्रेम...

बस स्टँड,कॉलेज,डॅम कट्टे असायचे भेटीचे,
क्षणाच्या सहवासासाठी धडपडणारं होत माझं प्रेम...

शोधुन कुणास सापडलं का आजवर,
तिच्या ओढीने मात्र गवसणारं होत माझं प्रेम...

समाजात नेहमी बट्ट्याबोळ ह्याचा,
गैरसमज पाळणाऱ्यांना भिणारं होत माझं प्रेम...

गल्लीबोळीत नव्हे गावात होती चर्चा,
नको त्या शब्दांचं विष पिणारं होत माझं प्रेम...

थट्टा गल्लत करीत होती काहीशे कुत्रे,
दगड धोंड्या मनाला न उमजणारं होत माझं प्रेम...

भले बुरे समज नेहमी आले ह्याच्या पदरी,
बाकी कुट नीती पछाडणारं होत माझं प्रेम...

नाती गोती ठोकर देताना आले जेव्हा लक्षात,
अमानुष न होता त्यांना मान देणारं होत माझं प्रेम...

सांग्यांच्या विळख्यात गवसे हे सदा,
खऱ्या अस्तित्वासाठी झगडणारं होत माझं प्रेम...

मन हुलकावले जेव्हा तिच्याच प्रिय लोकांनी,
क्षणातच आतुन तुटून कुजणारं होत माझं प्रेम...




© _राहुल अनिल कांडे

( सहवास आठवणींचा | 197rd...)