आई
पुन्हा एकदा ये कुशीत मला घे
या मतलबी दुनिये पासून लांब जरा ने
चिघळलेल्या या जखमांवर फुंकर तू घाल
माझ्या मोडलेल्या मनाला तूच सांभाळ
तडफडनाऱ्या जीवास तुझाच एक आधार
मायमाऊली का गेलीस सातासमुद्रा पार
हा देह आता नाही काही कामाचा
मातीतून येउन मातीत विलीन व्हायचा
पुन्हा एकदा आयुष्य मिळो
तुझ्याच पोटी जन्म मिळो
माय माझी तू जिवाभावाची
उणीव तुझी सलत राहते मनाशी
अंधारलेल्या दाही दिशा
मार्ग ना सापडे कोणता
पुन्हा एकदा ये हात धरण्या माझा.....
आई ..........
या मतलबी दुनिये पासून लांब जरा ने
चिघळलेल्या या जखमांवर फुंकर तू घाल
माझ्या मोडलेल्या मनाला तूच सांभाळ
तडफडनाऱ्या जीवास तुझाच एक आधार
मायमाऊली का गेलीस सातासमुद्रा पार
हा देह आता नाही काही कामाचा
मातीतून येउन मातीत विलीन व्हायचा
पुन्हा एकदा आयुष्य मिळो
तुझ्याच पोटी जन्म मिळो
माय माझी तू जिवाभावाची
उणीव तुझी सलत राहते मनाशी
अंधारलेल्या दाही दिशा
मार्ग ना सापडे कोणता
पुन्हा एकदा ये हात धरण्या माझा.....
आई ..........