...

6 views

जगत मी आलो असा
जगत मी आलो असा की, जसा जगलोच नाही
अडकुण तुझ्यात मी तुला कधी विसरु शकलोच नाही

तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही
दुःख मनातले चेहर्‍यावर कधी दाखवु शकलोच नाही

खोटे हसु दाखवुन चेहर्‍यावर डोळ्यातले पाणी अडवलेच काही
रडलो असा की मी पुन्हा कधी हसलोच नाही

एकदाच पडलो प्रेमात की असा काही
पुन्हा कधी हृदयाने ठाव घेतलाच नाही

बांधीत गेलो तुला शब्दात मी असा काही
पुन्हा कधी सोडवु शकलोच नाही