...

11 views

उमलती कळी
    
 इतक्या वर्षात पहिल्यांदा
इतकी सुंदर कळी दिसली
फुलांच्या गुच्छयात न राहता
वेगळी होती बसली

ती उमलत का नव्हती
हे तिलाच फक्त ठाव
मी माझ्या मजेसाठी
मांडला माझा डाव

खुलत नाही फुलत नाही
कशात आहे ती गुंग
व्यंगावर हसत नाही
आहे का जराशी मंद

मित्र मैत्रिणींना सोडून राहणे
कसे कोणाला आवडेल
एकांतात शांत बसून रोज
कसे भविष्य फुलेल

इच्छा तर खूप आहे की
त्या फुलाचा देठ मोडावा
कळी उमलयाच्या आत
त्याच्याशी संबंध जोडावा