जीवन हे स्त्रीचे खरे .....
मुलगी म्हणून तिझा जन्म झाला
आदिशक्तीचा वारसा घरी आला,
हळू हळू जीवनी ती मोठी झाली
शिक्षण घेण्यासाठी वयात आली,
शिक्षणसाठी शाळा कॉलेज्यात जाते
बाहेर पडताना ओढणी सांभाळून घेते,
आरे मुलगी ही लक्ष्मी आहे रे मायेची
काळांतराने सुरुवात मासिक पाळीची,
मुलगी म्हणून ती सातच्या आता घरात
मुलगा फिरू शकतो रातभर देशभरात,
नकोरे असे करुस भेदभाव तु मानवा
मुलीचा ही तु खरा आनंद रे जाणावा,
आयुष्यात तिच्या आहे रोजचे घरकाम
काम करता करता विसरावे रे आराम,
मुलगी म्हणून घरीच लक्ष्य लागते द्यावे
आयुष्यात बाहेरचा आनंद कधी घ्यावे,
काही वर्षांनंतर लग्न करावे रे लागते
आई वडिलांपासून दूर जाऊनी जगते,
नवऱ्यासोबत सुखाचे संसार ती करते
सासर सांभाळण्यातच वर्ष तिझे सरते,
संसारात ही रमले जाते तिझे सारे मन
काही दिवसांनी येते तिझे हे बाळंतपण,
आनंद आणणारे असतात हे तिझे क्षण
बाळ येणार म्हणून आनंदात सारे जण,
आयुष्य स्त्रीचे आहे खूप वेगळे ते खरे
कधी आनंद तर कधी दुःख असते सारे,
येतो एखादा जीवनी रे अपघात वाटेला
विधवेपणामुळे सुरुवात दुःखाच्या
लाटेला,
मुलांची जबाबदारी पडते अंगावर सारी
तेव्हा कष्ट करुनी वाढवते मुलांना खरी,
मुलांचे शिक्षण असू किंवा पोट त्यांचे
मरण होते रे काम करताना खरे स्त्रीचे,
किती सहन कराव्या लागतात गोष्टी काही
एकदातरी मानवा स्त्रीचे जीवन जगुनी
पाही,
तिझ्या सारखे आयुष्य जमणार नाहीरे
तिझ्यात आदिशक्तीचे रूप खरे आहेरे.......
----------------------------------------------
*✒️कवी:-स्वहित दिपक कळंबटे...*
*(स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य)*