...

3 views

पाउस
किती रे पाऊसा किती रे बरसतोय
तुला जरी कंटाळा नाही पडयला
पन अम्हाला आलाय तुझा

द्यावी आता काही दिवसांची उघडण पाऊसा़ आता फक्त अंगावर शेवाळ यायच बाकी राहीलय नाही तर नदी,नाले, धरण, बंधारे तुडूंब भरलेय फुगलेय बेडकावाणी...

भरून गेले शहरातले सारे गल्ली बोळ
भरून गेलेत सारे गाव,
गाडी विकून घेऊन टाकतो एक छोटीसी नाव

उघड उघड उघड बघू दे एकदाचा तो सुर्यनारायण
कुठे लपला माहित नाही बाप्पा पडू दे जमिनीवरती थोड तरी ऊन

कंटाळा आलाय पाऊसा घरात बसून आता थोड तरी थांब मागच्या वर्षी पाहिला पाण्याखालील सांगली, सातारा, कोल्हापुर आणी आता काय ?
नको रे बाप्पा नुसत्या विचारानेच निघतोय आमचा धुर

ऐैक रे पाऊसा आता तरी थांब
दे आता उघडण बघू अम्हाला सर्व दुर