...

4 views

Motivation
औराळा - घरात अठराविश्वे दारिद्र्य, आई-वडील ऊसतोड कामगार, गावाच्या कडेला दहा बाय वीसचे छप्पर. त्यात पाच जणांचे कुटुंब. दीड एकर शेती, तीही खडकाळ जमीन. अशा विपरीत परिस्थितीवर मात करत दीपकने आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. रूमवरील मुले झोपल्यावर त्यांची पुस्तके घेऊन, तर दैनिके वाचनासाठी चहाच्या टपरीवर जाऊन दीपकने अभ्यास पूर्ण केला. आज लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत त्याची फौजदार म्हणून नियुक्ती झाली आहे.

दीपक प्रकाश वाघ असे फौजदार झालेल्या कन्नड तालुक्यातील कानडगावच्या युवकाचे नाव आहे. आई-वडिलांची प्रबळ इच्छा होती की मुलांनी...