...

1 views

संघर्ष एका मशालीचा

ती कशी तगली तिचे तिलाच ठाऊक,तिच्यासाठी आयुष्याचे रहाटगाडगे खूप चेंगटपणे व वेदनामय रीतीने पुढे सरकत होते.असं लक्ष्मीबाईंना पाहून मला वाटत राहायचे.लक्ष्मीबाईचा हा जीवन प्रवास फार खडतर होता पण त्यांच्यावर आघात करणारया संकटांवर पाय रोवून पुढे चालत राहाण्याची त्यांची हिम्मत ही कमालीची होती.लक्ष्मीबाईकडे फारसं असं काही नव्हतं पण या दाम्पत्याकडे एक छोटासा जमिनीचा टुकडा होता ज्यात कुंटुबाची रोजची गुर्जरानही होत नव्हती,अशा वेळी त्या दुसरयाच्या शेतावर राबून आपला संसार पुढे रेटत होत्या. शिवाय याला हातभार म्हणून त्यांनी म्हशीही घेतलेल्या होत्या. लक्ष्मीबाई आणि मुस्लीम समाजाचे घनिष्ठ संबंध होते कारण त्यांच्याकडे दुध घालण्याचे काम त्या करत असतं.लक्ष्मीबाई शांत,मनमिळावू व प्रेमळ आहेत त्यांच्या या स्वभावामुळे त्या कुणाच्याही दु:खात चटकन सहभागी होतात.पुढच्या माणसाला हिम्मत देतात.त्यांची काम करण्याची पध्दत चांगली आहे त्यामुळे त्या माणसं जोडत गेल्या आणि सर्वांना सांभाळून घेत पुढे चालत राहिल्या.या सर्वाचा परिणाम त्यांच्या कुंटूबावरही होत होता यातून ही सारी माणसं घडत होती.लक्ष्मीबाई आणि मदिनाच्या घराचे नाते जुळले होते.त्यामुळे सणावाराला त्या आर्वजून येत असतं.आजही मदिना न विसरता त्यांच्या सणाचा गोडवा म्हणून शिरकुरमा घेऊन त्यांच्या घरी जाते,इतका त्यांचा लोभ आहे तो त्यांच्यातील वात्सल्यामुळे,मायेमुळेच.लक्ष्मीबाईचे मन हे समुद्रासारखे अथांग आहे.त्या सर्वाना सामावून घेतात.त्या परिवर्तनशील विचारांच्या आहेत.त्यामुळे कोणत्याही समाजाच्या प्रत्येक कार्यात त्या स्वत: सहभागी होतात.व सर्वांना योग्य मार्गदर्शन करतात.शून्यातून विश्व निर्माण करणारी कणखर,स्त्री म्हणजे लक्ष्मीबाई होय.खरंच त्यांच्याकडे बघून मला म्हणावेसे वाटते 'तुम सम कोई नही'.
आजही त्या कणखर आहेत.जमिनीच्या एका छोट्याशा तुकड्यातही ठरविले तर नियोजन करुन बरीच पिके घेऊ शकतो हे त्यांनी आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने समाजाला दाखवून दिले आहे.लक्ष्मीबाई नेहमी म्हणतात की,"शिक्षणाबरोबरच शेतीचे ज्ञान आज प्रत्येकाला असने गरजेचे आहे.त्यातूनच गावाचा विकास होतो".
त्यांचे शिक्षण किती झाले हे मात्र आम्हाला माहीत नाही.पण एका चांगल्या समाजासाठी,गावासाठी,गाव विकासासाठी राजकारणात नवीन पिढीने उतरावे असे त्या आजच्या पिढीतील तरुणांना सांगत असतात.परिवाराला एकसंघ ठेवण्यासाठी लक्ष्मीबाई व त्यांचे पती यांनी खूप कष्ट केले.घराला टिकून ठेवले,घराला घरपण दिले.ते आजही आपण सर्व पाहतो आहोत.
त्यांच्या पतीचांही स्वभाव मनमिळावू व सर्वांना सामावून घेऊन पुढे वाटचाल करणारा असाच होता.पण ते थोडे कडक स्वभावाचे होते पण लक्ष्मीबाईनी त्यांना सोबत घेऊन आयुष्याची वाट सुकर केली.संसाररुपी ह्या रथाचा समतोल ठेवला आहे.
खरंच म्हणतात ना 'खरा आनंद हा देण्यात असतो' ते मला आता कळतंय आणि कदाचित लक्ष्मीबाईनी ते कळत न कळत आम्हालापण त्यांच्या वागणुकीतून शिकवलंय.आजही त्यांच्या परिवारातील सारेजण त्यांचा आशीर्वाद घेऊनच घरा बाहेर पडतात.एक स्त्री म्हणून त्यांच्या जीवनातील ह्या घडामोडी प्रशंसनीय तर आहेच शिवाय दुसरया स्त्रियांना खूप काही शिकविणारे आहे.
मी एवढे:च म्हणेल, लक्ष्मीबाईना उदंड आपुष्य लाभो आणि त्यांचा येथून पुढचा प्रवास आनंदात जावो.
नवरात्रीच्या सर्वाना खूप खूप शुभेच्छा....