...

3 views

अनमोल गिफ्ट
चिन्मयी 16 वर्षांची गोड मुलगी होती. खूप हुशार अशी एकही गोष्ट नव्हती जी तिला येत नसत. पण आईनी स्वयंपाकात मदत करायला सांगितली की झाले हिचे बहाने सुरू.
एक दिवस असच एका रात्री चिन्मयी तिचे वडील आणि लहान भाऊ टेबलावर बसलेले असताना अचानक तिला आठवत उद्या आईचा वाढदिवस आहे ती आईला सरप्राईज द्यायचं ठरवते ती लगेच जेवण करून लवकर झोपायला जाते. आणि सकाळी लवकर उठून सगळं आवरून घेते . आई बाबांना चहा ठेवते तसेच सुंदर नाश्ता बनवून आईला वाढदिवसाच गिफ्ट देते. हे सगळं बघून चिन्मयी च्या आईच्या डोळ्यात पाणी येत तिला खूप आनंद होतो ती विचार करते आपली मुलगी मोठी झाली.

© dhanashri