हळद आणि हडळ - ९
हळद आणि हडळ - ९
अमृताने मागे वळून पाहिलं. सावली तिच्या जवळच उभी होती. हसत खेळत दोघीही तिथेच उभ्या राहून गप्पा मारू लागल्या. एव्हाना अमृताचे आई, बाबा आणि आजी गेट जवळून अमृताला आवाज देऊ लागले होते. "चल बाय, नंतर बोलू" असे बोलून हातवारे करत अमृता सावलीचा निरोप घेऊ लागली. या तिघांनाही ती कुणाशी बोलते, काहीच कळत नव्हते. ती एकटीच होती. कुणाशी हसते?, कुणाशी बोलते?, कुणाला हात करते?. म्हणजे अमृता भुतांशी बोलते का? कि तिला भास होतात? सामान्य बुद्धीला न पटण्यासारखे आणि न सुटण्यासारखे कोडे होते ते. या तिघांजवळ येताच पुन्हा ती सामान्य वागू लागली. तिच्या वागण्यावरून एकच स्पष्ट होत होतं, ते म्हणजे कुणीतरी आहे ज्याच्याशी अमृता बोलते, तिला दिसते परंतु इतर कुणालाही "ती" दिसत नव्हती. बाहेरच कुणी पाहिलं तर, एकतर अमृतालाच भूत समजलं असत किंवा वेडी.
दुपारची वेळ होती. मंडप सामानाच्या गाड्या अंगणात लागल्या होत्या. अमृताचे बाबा इतर सामानाची जमवा जमव करण्यात व्यस्त होते. गावातील बाया बापड्या उटणे लावायला जमल्या. घराचा हॉल बऱ्यापैकी भरला होता. लग्नाचा वातावरण आता इथून फुलणार होता. गोंधळ, हसी मजाक, सर्वांच्याच चेहऱ्यावर...