...

1 views

स्वयंसिध्दा
मी आता स्वयंसिद्धा
ना घाबरते धमक्यांना
ना बळजबरी कृष्णकृत्यांना
ना मारामारी ,मानसिक छळांना
ताणलेल्या तनमनाच्या मृदु नात्यांना
पुकारते मी मानवहक्कांना
नरा वा वा-नरा सुधार तुझ्या कृत्यांना

घट सांभाळत बसण्याचे जगपरंपरेचे बांधलेले लोढणे कुठवर सहायचे!
वेळ येतेय ,
घर घाटांवर
सहनशीलतेचा विस्फोट होतोय
न घरातली ना घाटावरची आता होणार नाही कुणीही
दोन कुटुंबांच्या रस्सीखेचेत
वाताहात नाही होऊ देणार मी

घट फुटलाच, तर म्हणणार ना जगबुडी ही
बाजू स्वतःची वा लेकीची
सांधीन स्वकर्तृत्वानी शिक्षणानी अर्थार्जनानी
दोन्ही पायांवर अचल ऊभी मी
आवरेन सावरेन पुन्हःपुन्हा ऊभारीन
विजयाची गुढी मी
*घाटा घाटावरचे* पाणी आता मीही प्यायलेली
मी स्वयंसिद्धा.


ही समस्त, आधुनिक पण परंपरा जाणणार्या , सम तोल पण धाडसी , अन्याय न होऊ देणार्या स्त्रिया आया बहिणी मुलींच्या मानसिकतेची कविता