...

2 views

जागतिक महिला दिन विशेष
आज स्त्री मुक्ती दिन आहे पण मी तो साजरा करीत नाही.रिकामे शिल्प भारंभार जमा करायचे आणि त्यांच्यात मोती होता असे सांगून आनंद व्यक्त करायचा तसंच काहीस आजच्या दिवसाचे आहे.शृंखलेत जखडलेली स्त्री अजूनही जखडलेलीच आहे. शृंखलेची एकही कडी अजून तुटलेली दिसत नाही.प्राचीन काळापासून स्त्री भोगाची वस्तू होती आणि आज होणारे बलात्कार पाहून ती भोगाचीच वस्तू आहे याची खात्री पटते. स्त्रीसाठी कायद्याचं संरक्षण,साह्य म्हणजे बिरबलाची न शिजणारी खिचडीच आहे.'उपनिषदात' म्हंटले आहे 'पुत्र आमच्या घरी आणि कन्या शेजारच्या घरी जन्मास यावी'आजही हीच भावना दिसून येते.स्त्रीने कसे रहावे,कसे वागावे, मोठ्या आवाजात हसू नये,कपडे कसे घालावे हे सुध्दा 'ऋग्वेदात' सांगितले आहे. मग फरक काय पडला? आज शिकलेली लोकं स्त्री मुक्ती दिन साजरा करतात आणि आजही कष्टकरी महिला टिचभर पोट भरण्यासाठी श्रम आणि अत्याचार सहन करतात, किती मोठा विरोधाभास..."जागतिक महिला दिन चिरायू हो"-प्रा.जया शिंदे.