...

11 views

A big challenge.... भाग... 1
"A"Big challenge..... भाग.. 1

"सर ", "मला पाच एप्रिल पासून प्रसूती रजा टाकायची होती "
नम्रता उदगारली.
भाकरे सर (मुख्याध्यापक ):"ठीक आहे मॅडम तुम्ही जाऊ शकता, परंतु प्रसूती रजेवर जाण्याअगोदर डॉक्टरांचे मेडिकल सर्टिफिकेट सादर करा म्हणजे झालं,

"माझ्याविषयी थोडीही सहानुभूती वाटत नाही, म्हणे सर्टिफिकेट आधी आणा मगच जा "नम्रता मनातल्या मनात पुटपुटली..
नम्रता :कथेतील संवेदनशील पात्र, स्वतःच्या अस्तित्वाला वेगळेपण देणारी, आयुष्य तर एरव्ही प्राणी, पक्षीही जगतात.

नम्रता डॉक्टरांनी सांगितलेल्या तारखेप्रमाणे पाच एप्रिल पासून सप्टेंबर पर्यंत प्रसूती रजेवर गेली..... त्यानंतर नम्रताच्या खऱ्या आयुष्याला सुरुवात झाली ती अशीं..

नम्रताला कन्यारत्न झाले, तिच्या जगण्याला प्राण मिळाला, तीची गोंडस मुलगी तिच्या जगण्याचं कोडं होतं... नम्रता स्वतःच्या मुलीबाबतीत जरा जास्तच भावुक होती.. शेवटी तो दिवस उजाडला, 27ऑक्टोबर आज नम्रताला शाळेत हजर व्हायचे होते, पुणे ते नाशिक लांबचा प्रवास होता सोबत तिचं निरागस पिल्लू,.. दुपारी तीन वाजता ती शाळेत हजर झाली.. पुणे ते नाशिक लांबचा प्रवास होता, सप्टेंबर महिना असला तरी, उन्हाचे चटके बसत होते, नम्रताची मुलगी फक्त पाच महिन्यांची होती, पण चिमुरडीने प्रवासाचा एवढा मोठा पल्ला गाठला,.नम्रता नाशिकपासून 50किमी लांब असलेल्या जि. प. शाळेत शिक्षिका होती.. खेडे गाव होते पण लोकसंख्येने मोठे होते.. नम्रताची गाडी शाळेच्या बाहेर फाटकाजवळ थांबली, सहा महिन्यानंतर नम्रता शाळेला बघत होती, "जणू ती नम्रताकडे बघून हंबरत होती आणि उदगारली, बरं झालं बाई नम्रता तू आलीस!, आता कुणीतरी माझ्या जवळची व्यक्ती आल्यासारखं वाटतंय."..नम्रता जागेवरच थबकली, पूर्ण शाळा निःशब्द झाल्यासारखी वाटली तीला.. भयाण शांतता वाटली,..हळूहळू पाऊल फाटकाच्या आत मुख्याध्यापक कार्यालयाकडे टाकले..क्षणभर नम्रताला वाटले की ही आपलीच शाळा नं !..एका कडेवर मुलगी घेऊन नम्रता मुख्याध्यापक कार्यालयात पोहोचली. नम्रता शाळेत भाकरे सरांची जिल्हांतर्गत बदली झाली असल्यामुळे सिनियर होती, पण प्रसूती रजेवर असल्याने गावंडे मॅडमकडे मुख्याध्यापक पद होते ज्या नुकत्याच बदली होऊन शाळेवर हजर झाल्या होत्या...नम्रताला ज्युनिअर होत्या गावंडे मॅडम.. नम्रताने खूप संघर्ष करून ही नोकरीं मिळवली होती, तीला ठाऊक होते की आपल्याकडे शाळेत हजर झाल्याबरोबर मुख्याध्यापक पदाची जबाबदारी येईल, ती हे कटू सत्य जाणत होती कारण तीची चिमुरडी अवघ्या पाचच महिन्याची होती, पण तीला वाटत होते शाळेत इतर पुरुष शिक्षक होते त्यांना आपण विनंती करू मुख्याध्यापक चार्जे घेणेबाबत. कार्यालयात पोहोचताच चित्र खूप वेगळं वाटलं, गावंडे मॅडम ऐटीत बसल्या होत्या मुख्याध्यापक खुर्ची मध्ये, फोन वर कुणाशीतरी बोलत होत्या, नम्रता हजर झाली, फक्त एका महिला शिक्षिकेने तीला तेवढं चहा, पाणी विचारलं, नम्रताला हायसं वाटलं..शाळेत दीर्घ रजेवरून हजर झाल्यानंतर मुख्याध्यापक शिक्षक शालेय कमी हजर झालेबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवतात ही गोष्ट नम्रताला भाकरे सर मुख्याध्यापक असतांना माहित होती. त्यामुळे नम्रताने गावंडे मॅडम कडे प्रसूती रजेवरून शालेय काम करण्यास फिट असलेबाबतचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर केले. नम्रताला तिच्या सासरचे हुंड्यासाठी मानसिक त्रास देत होते,, नम्रता कुशाग्र बुद्धिमत्तेची शांत, मेहनती मुलगी होती.तिच्या शिक्षणासाठी तिच्या आईवडिलांनी खूप कष्ट सोसले. आईने बैलबाजारात गवत विकणे, तीन तीन किमी पायी जाऊन उघड्या डोईवर लाकडाची मोळी आणणे, दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करणे अशी अनेक कामे नम्रताच्या आईने उदरनिर्वाह आणि लेकरांच्या शिक्षणासाठी केली. नम्रताही काही कमी नव्हती दहावीला असतांना सुट्टीच्या दिवशी दुसऱ्याच्या शेतात वांगी तोडणे, दगडं उचलणे, भेंडी तोडणे अशी कामे करूनही तीने अभ्यास केला,,उन्हाळ्याच्या दिवसात नम्रता भेंडी तोडायला जात होती,... सूर्य कणखर तापायचा, भेंडी तोडतांना बोटांना रक्त लागायचं, ती रडकुंडीला यायची, पण काम केले नाही तर पैसे कुठून मिळणार होते, नम्रताला दहावीला अभ्यासासाठी अपेक्षित घ्यायच्या होत्या, म्हणून जिद्दीने ती काम करायची. आज नम्रताची आई अंथरुणाला खिळलेली आहे, मेंदूला रक्तपुरवठा होत नाही, आणि मानेची नस दबलेली आहे अश्या डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे नम्रताच्या आईच्या मानेची शाश्त्रकिया करावी लागली... नम्रताला वाटले आई बरी होइल, पण तसें झालेच नाही. तिच्या आईची मानसिक स्थिती खूप चांगली, पण शरीराने ती थकली होती. एकीकडे नम्रताची प्रसूती झाली, तेव्हा नम्रताच्या मोठ्या बहिणीने आईसारखे कर्तव्य बजावले. पण नम्रता सुरुवातीपासूनच स्वाभिमानी ती फक्त दोन महिने बहिणीकडे प्रसूती काळात थांबली, नंतर ती तिच्या आई बाबांकडे गेली..

दोन महिन्यांची बाळंतीण नम्रता, घरात अंथरुणाला खिळलेली आई, तीला जागेवरून उठता बसताच येत नाही, आणि थकलेले वडील याचा पुढचा प्रवास

पुढच्या गोष्टी मध्ये....