...

1 views

आठवणी
आज आपल्याला इतके बेचैन का वाटतं,मन उदासीनं इतकं काळवंडून का गेलं असेलं हे कळेनासं झालं. आपल्याला नेमकं काय हवं होतं ? आपण कशाच्या मागे उर फुटेपर्यंत धावत सुटलो होतो ? काही,काहीच कळत नाही.अनेक दिवसापासून असे कितीतरी प्रश्न छळतात.उदास वाटायला लागतं.तरी आयुष्याची वाट ही चालावीच लागते.पण ह्या उदासीची काळी छाया काही केल्या पाठ सोडत नाही आणि मग भूतकाळ डोळ्यासमोर चित्रपटासारखा स्मरु लागतो.वाटतं किती काही बदलून गेलं ना.त्याकाळी आपण किती उत्साही आणि आनंदी असायचो.तेव्हा वाटायचं आपण दगडावर जरी बीज टाकलं तरी ते रुजेल,अंकुरेल आणि ओसाड रानावरही आपण नंदनवन फुलवू शकतो.कशाचीच पर्वा नव्हती की भीती नव्हती.अगदी बेफिकीरीने जगत होतोत.खूप आशावादी आणि सकारात्मक होतो आपण. आज या गोष्टी जरी आठवल्या तरी धक्का बसतो आणि वाटतं खरच खरं होतं हे सारं..पण आता वाटतं गेल्या काही वर्षात किती काही बदलून गेलं ना.आयुष्य बदलले , दृष्टिकोन बदललेत आणि जग ही बदलले...पण आपण मात्र आहे तिथेच आहोत. शुभसंध्या -प्रा.जया शिंदे