...

1 views

⭐*गुरुपौर्णिमा*⭐
गुरू पौर्णिमा..हा गुरूंचे आदर आणि आभार व्यक्त करण्याचा दिवस...तसं बघितले तर *गुरू* यांचा दिवस.. हे ३६५ दिवस..पूर्ण वर्षभर असतात.जीवनात येणारा प्रत्येकजण आपल्याला काही न काही तरी शिकवत असतो.
आपला सर्वात पहिला गुरू म्हणजे आपली आई..नेहमी आपल्याला काही न काहीतरी शिकवत असते..जसे की चालायला,बोलायला,वागायला,स्वयंपाक करायला इ..
आपले दुसरे गुरू म्हणजे आपले बाबा..जे जगात कसे सामावून..जमवून घ्यायचे हे शिकवतात...स्वप्न बघायला शिकवतात.
तिसरे येतात ते आपली भावंड...भांडलो तरी वेळ आल्यावर आपल्या पाठीशी उभे राहतात..सांभाळून घेणे.. शिकवतात.
शालेय जीवनातील शिक्षक/शिक्षिका..गृहपाठ द्यायचे तेव्हा राग आणि कंटाळा यायचा...पण मोठे झाल्यावर त्याची किंमत कळते...अभ्यास केला नाही म्हणून पाठीवर धपाटा देतात आणि चांगले मार्क्स मिळाले की त्याच पाठीवर शाबासकीही देतात
मित्र हेही गुरू असतात..आता तुम्ही म्हणाल मित्र कसे गुरू..मी सांगते..
परीक्षेच्या २/३ दिवस आधी सगळं रिविजन करून घेतात..म्हणजे एक प्रकारचे गुरुच झाले की..हो न
आपण केलेल्या चुका.. ह्याही गुरू आहेत.जेव्हा आपण चुकांमधून शिकतो आणि ती मान्य करतो आणि परत ती चुक करत नाही...तेव्हा ती चूक आपली गुरू बनते.
आता सर्वात मोठा गुरू म्हणजे आपले आयुष्य..जे आपल्याला खूप काही शिकवत असते.आपल्या कळत नकळत आपण ते शिकतो व आचरणात सुद्धा आणतो.आपण मोठे होत असताना इतकं काही घडतं आपल्या सोबत..चांगले,वाईट आणि त्यातून आपण खूप काही शिकतो..जसे की..जर आपण परीक्षेत नापास झालो तर आपण हे शिकतो की पुढच्या वेळेस आपण जास्त छान अभ्यास करायचा आणि चांगले भरपूर मार्क्स मिळवायचे.
*अश्या सगळ्या गुरूंना माझे नमन*
सर्वांना...
*गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा*🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹