...

4 views

एकतर्फी प्रेम (पार्ट 2)
नंतर त्यांचे काॅलेज सुरू होते . काॅलेज च्या पहिल्या दिवशी सगळे जण आदिती चे वेलकम करून क्लास रूम मध्ये जातात .
लेक्चर'स संपल्यावर सगळे घरी जायला निघतात . प्रतिक चे & आदिती चे घर एकाच बिल्डिंग मध्ये असल्याने दोघ सोबत जातात . हे सिद्धार्थ ला खटकते . सिद्धार्थ मनोमन ठरवतो .की काही ही झाले तरी आदिती ला प्रतिक च्या जवळ जाऊन देणार नाही .ती फक्त माझीच आहे . पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
प्रतिक आदिती सोबत ओळख झाल्यापासून तो काही ना काही कारणाने आदिती च्या घरी जायचा . आदिती च्या आई बाबांना प्रतिक चा स्वभाव आवडायचा . आदिती चे बाबा मनात च बोलायचे आपल्या आदु साठी हा मुलगा परफेक्ट आहे. एक दिवस आदिती नसताना आदिती चे बाबा प्रतिक ला एकांतात घेऊन विचारतात . की तुला आदिती आवडते का . माझ्या मुलीशी लग्न करनार . प्रतिक ला सुद्धा हेच पाहिजे होते . पण तो मनातुन घाबरला होता . त्याला वाटले आदिती चे बाबा अचानक पणे असे का विचारायला लागले .& त्यांना माझ्या मनातले कसे समजले . असा मनात विचार करत बसला . तेवढ्यात आदिती च्या बाबांनी त्याच्या पाठीवर वर थाप मारत बोलले अरे कशाचा विचार करत आहेस . तुला नाही आवडत का आदिती . नसेल तर मला स्पष्ट पणे सांग बाळ . मी तुला जबरदस्ती नाही करनार . मी सहजच विचारलं. तुझा स्वभाव छान आहे . सगळ्यांमध्ये मिळुनमिसळुन राहनारा आहेस . & सगळयात Important म्हणजे तुम्ही दोघं छान मित्र आहात . तु मला न घाबरता सांग तुझ्या मनात काय आहे . मी तुझ्या डोळ्यांत आदिती विषयी प्रेम बघितले आहे . ( प्रतिक ) हो बाबा माझे प्रेम आहे...