...

7 views

कालिदास भवभूती संवाद
काल,परवा एक जुना दिवाळी अंक चाळतांना कालिदास आणि भवभूती यांच्यातला मैत्रीपूर्ण संवाद वाचला..भाषेच्या महतीचाही व भाषेतील व्यवस्थितपणा व नियमांबद्दलचा तो एक सुंदर असा किस्सा आहे.
कालिदास अलोकिकच होता हे त्याच्या अनेक वचनांवरून दिसून येते.मी दिवाळी अंकात एक दंतकथा वाचली त्यामध्ये कालिदासाला भवभूतीने आपले उत्तर रामचरित्र हे नाटक वाचून दाखवले पण हे ऐकत असताना त्यावेळी कालिदास हा सोंगट्या खेळत होता तेव्हा त्याचे लक्ष नाटक वाचन ऐकण्याकडे फारसे नाही असे भवभूतीला वाटले आणि तसे वाटणे सहाजिकच होते.पण वाचन संपल्यानंतर कालिदास त्यांना म्हणाला सर्व ठीक आहे फक्त एक अनुस्वार कमी करावयास हवा "-अविदितगतयामा रात्रिरेवं व्यरंसीत-न कळत प्रहर निघून गेलेली रात्र अशा रीतीनें संपली. कालिदासानें सुचविले-"अविदितगतयामा रात्रिरेव व्यरंसीत" न कळत प्रहर निघून गेलेली रात्रच संपली......असा केवळ एक अनुस्वार कमी केल्याबरोबर जमिनीवर सरपटणारी ओळ भरारी मारून उंच गगनाला जाऊन भिडली केवढे हे एका अनुस्वाराचे सामर्थ्य......
भाषा आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करते ते भाषेच्या व्यवस्थितपणामुळे व नियमबध्दतेमुळेच,नाही का?नाही तर "ध" चा "मा" व्हायला वेळच लागणार नाही,बरोबर ना...
शुभ सकाळ...शुभ रविवार

-जया शिंदे