आम्हीं पाचलेगावकर...! बरं का..!!
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालूक्यातलं, करपरा नदीवर निवळी येथील मातीच्या धरणाच्या पायथ्याशी, राष्ट्रसंत श्री. नृसिंह पाचलेगांवकर मुक्तेश्वर महाराजांची जन्मभूमी, वारकरी संप्रदाय आणि संत परंपंरेंतील भक्तीभाव असलेलं, निजामकालीन राज व्यवस्थेत हिंदू-मुस्लिमांच ऐक्यभाव सुखानं नांदत असलेला ग्रामीण भाग , देवकर-देशमूख नावानं नावजलेलं आमचं छोटंसं गाव म्हणजे पाचलेगाव...
आमच्या मागील अनेक पिढ्यानं पिढ्याचं 'वतन' असलेलं मूळ गाव.. पण माझा जन्म परभणीचाचं..!
निजामकालीन रजाकाराच्या हिंदू-मुस्लिम दंगलीत मराठवाडा पेटलेला असताना आमच्या गावी मात्र इथल्या बंधू-भाव सलोंख्यानं मुस्लिमांना आपलंस करून त्यांनी कुठंही स्थलांतर होऊ नं देता गावच्या मातीशी एकनिष्ठता ठेऊन आपली सर्व कुटूंब इथं सुरक्षित राहण्यासाठी...