...

3 views

एक सकाळ अशी हि!..🍁
आज सकाळी उठलो!..डोळे चिमचिमत होते,उठावसे न वाटत असताना योगेश आणि दिगंबर च्या त्या टीमटीम च्या आवाजाने मग शेवटी ऊठनेच झाले!...'झाला मग दिवस सुरू!...डोळ्यावर पाणी फिरवून बाल्कनी जवळ उभा राहीलो बघितले तर काय,आमच्या घरासमोरील "हदग्याच फुल!...कदाचित् २-३ इंच उंचीचे,हिरवेगार आणि टोकदार पात्यांनी बहरलेले ते पांढरेशुभ्र फुल मन जिंकायला आणि आकर्षित करायला पुरेसे!....

" मला त्या हदग्याच्या फुलांना खान्याची रोजची ओढ कदाचित च पुरी होवो!..मला वाटतं ज्याप्रमाणे "हदग्याच्या फुलां च्या खान्याविषयी मी मनाला रोज जिंकतो,त्याचप्रमाणें जर मी आयुष्यात प्रत्येक दिवशी त्या मनाला जिंकलं तर किती चांगले!...

'हाक येताच आत आलो दिसले परत ते दोन उंदीर!..पाहुण्यांचा मुक्काम या वेळेस जरा जास्तच राहीलेला ,पण त्यांना ते गोड-गोड लाडू व संभाजीनगर च्या साखरेचा सुगंध आवडलेला असणार हे निश्चिच! .त्यांच्या त्या उडया-धडया थांबताच नाही!...विचार येतो जर आयुष्य त्यांच्यासारखं मनसोख्त असतं तर?...

'टीमटीम वर आर्टिकल वाचत असताना अचानक त्या महान स्त्रीचे दर्शन झाले ...कदाचीत स्त्री म्हणणे अयोग्य च,'देवीच योग्य!...किती अस्पर्श अशी ती स्त्री;तिच्या बद्दल ऐकायला असावं अशी जमीनीवर असणारी एक 'कृष्ण दासी...अशी संत मीराबाई!..तिच्या चरित्र्यातुन कळते मनुष्याने जमिनीवर रहावे,मग वडील-धारांचे ते वाक्य आठवते " मोठे होऊन आभाळत जायचं!"..मनात मग कुठंतरी प्रश्न निर्माण होतो 'जमींनीवर रहावें की आभाळात कळतच नाही?..मनातून मग उत्तर येते कदाचीत त्यांचे "समाधानी"म्हणणे असावें!...

-Kiran Shamabai Shankar Sure
© All Rights Reserved