...

2 views

एक नातं माय लेकीचं...
जेव्हा मी मामाच्या घरी पोहोचले तेथे मी त्या माय लेकींना व‌ त्या मुलीच्या भावाला सोबत पाहिलं. ते तिघे मोकळ्या असलेल्या दिवाण वर बसले होते.मला त्यांना पाहून फार अचरज वाटले. मी मामांना विचारलं ''मामा ओळखता का तुम्ही यांना?"हे ऐकून मामा तर फारंच गोंधळले.. त्यांनी विचारले ''कोण गं?''
मी त्या तिघांकडे बोट दाखविले. मामांनी दिवाण‌ कडे नजर फिरवली व‌ म्हणाले, ''अरे बेटा तिकडे तर कोणीच नाही, असं‌ काय करतेस." मी थोडी घाबरले पण त्यांना परत विचारलं‌ 'नक्की तुम्हाला कोणीच दिसत नाहीये?खरं खरं सांगा माझी थट्टा करु नका!' मी उद्गारले. मामा म्हणाले, "अगं खरंच कोणीच नाही तिथे, तुझा भ्रम आहे तो...." सर्वांनी माझ्या गोष्टीची टाळाटाळ केली.
तुमचा ए.सी. चालूच होता तरी मला घाम फुटला, कारण जे मला दिसत होतं ते मामांना दिसलं नाही, शेवटी मी माझ्या मोठ्या बहिणीला विचारलं.. तुला पण दिसत नाही का? आपण बस मध्ये असताना च्या माय लेकी व तो मुलगा दिसतोय न?' ती पण नाहीच म्हणाली... तेव्हा माझी भीती इतकी वाढली की मला स्वतःचं ही अस्तित्व कळेनासं झालं होतं जणू... मी ती तिघे बसली होती त्याच दिवाणाकडे पाहत राहिले होते, आणि ती तिघे ही मला मंद स्मित देत होती... ते दृश्य अजून ही भयाण वाटू लागले.
आम्ही हाॅल मध्ये बसलेले होतो पण त्या दिवाणावर कोणीच बसले होते.... मामांनी मामीला हाक दिली. त्या किचनमध्ये आमच्यासाठी स्वयंपाक करत होत्या.. मामांनी बोलावले तेव्हा हातातलं असेल तसं सर्व‌ सोडून आलेल्या दिसत होत्या. आम्हाला पाहून त्या फार खूश झाल्या. माझ्याबद्दल त्यांचं फार प्रेम होतं. त्या मला म्हणाल्या '' तू येणार आहेस म्हणून मी तुझ्या आवडीचे सर्व पदार्थ केले आहे, लवकर जेवायला बस हं! मी वाढते.'' मी त्यांच्या समोर माझा तो घाबरलेला चेहरा प्रसन्न दाखवायचा प्रयत्न करत होते पण शेवटी त्यांनी ओळखले व मला विचारलं ''काय झालं आज माझ्या पोरीला?'' माझी आई मध्येच म्हणाली, ''काही नाही वहिनी, दमली असेल दूरचा प्रवास करुन त्यामुळे...''
मामी म्हणाल्या ''तू जेवण कर आणि थोड्यावेळ झोपी जा, बरं वाटेल गं." मी हो म्हणाले.. माझी नजर मी त्या दिवाणाकडे चुकून ही वळवली नाही.. फ्रेश होऊन, जेवलो...
दिवस उजाडला होता तरी दमल्या असल्यामुळे मी आणि माझी बहिण गेस्ट रूम मध्ये जाऊन झोपलो, मला खरीतर झोप लागली नाही. तसेच डोळे मिटून घेतले... थोड्या वेळाने उघडले बघते तर काय...ते तिघे माझ्या बेड च्या मागच्या बाजूला उभे, आतून डोर लाॅक असून हे आत कसे आले यावरून मी थक्क होते... ती चिमुकली मला पुन्हा तिच्या आईसाठी बनवलेलं ग्रिटींग कार्ड मला दाखवत होती आणि हसत होती...माझी तर बोबडीच वळली... मी कशीबशी पांघरून घेऊन झोपून गेले काय करावं समजेना.. हा दिवस मावळला...
पुन्हा दुसऱ्या दिवशी...
©Vanshika Chaubey
© All Rights Reserved
#toBecontinued