...

11 views

#मी नारी
#uvjadhav

#मी_नारी भाग - 1

सौन्दर्या नावाची एक छोटीशी आठ वर्षाची स्वीट सुंदर मुलगी होती . ती तिच्या संयुक्त कुटुंबात राहत होती . आई-बाबा आणि आजी-आजोबा.
सौन्दर्या ही खूप वर्षानंतर झाली होती. आणि ती एक मुलगी आहे. व त्यांच्या कुटुंबियांना मुलगा हवा होता. सौन्दर्या ची आजी सौन्दर्या ची चीड करायची . जेव्हा घरी 
कोणीही नसेल तेव्हा सौन्दर्या च्या आईशी भांडण करायची . सौन्दर्या च्या आईला ते सगळं सहन करावा लागायचं कारण तिला तिच्या छोटीशी मुलगी सौन्दर्या साठी जगावं लागणार होत. आई च्या मनाची व्यथा ती फक्त तिलाच जाणीव होती .

‛जर स्त्री स्त्रीयाची चीड करत असेल त्याला मान-सन्मान देत नसेल तर समाजाकडून काय अपेक्षा करू की समाजातील लोक स्त्रियांना मान द्यावं .’ स्त्रीयाने स्त्रियांच् मान केलाच पाहिजे .सौन्दर्या खेळत होती तेव्हा त्याच्या हातून खेळता खेळता चहा पेत असलेली आजी जवळ आजी आजी करीत जाते. सौन्दर्या च आवाज ऐकून आजी थोडी घाबरुन जाते .

व तिचा तोंड भाजुन जातो . तोंड भाजल म्हणून ती सौन्दर्यावर आक्रोशाने , क्रोधाने लाल होऊन तिच्यावर चिडते व चहा च कप खाली ठेऊन तिला हाताने जोराने धक्का देते. तशीच सौन्दर्या बधकंन जमीनिवर पडते व रडायला लागते , आत स्वंयंपाक करणारी आईच्या  कानी मुलीचं रडणं कानी पडते. तशीच ती व्याकुळ होऊन स्वयंपाक घरातून बाहेर धावत येते , पाहते तर सौन्दर्या जमिनीवर पडली आहे आणि खूप रडत आहे आई आई ssss  रडण्यातुन आईला आवाज देत आहे . तेवढयात सासूबाई बोलते काय हाय तुई मुलगी माय तोंड भाजून देल की हिने बयाड वाणाची कुठली.

तेव्हां तिच उत्तर देत आई म्हणते काहो आई माझ्या मुलीवर एवढं का ग चिडता तुम्ही तशीच शब्द कापत सासूबाई बोलते तुया मुलीनं माय तोंड भाजल ते तुले दिसणं न झाल आणि माझ्याशी तोंड लावतेस पहा हो आजच्या जमान्यांच्या नवरीन बायका सासुशी कशी भांडते . पाह पहा ग बायांनो- माणसांनो कशी हाय माई सून असं भांडण पाहायला येणारे बायांना व माणसांना सांगते.

तेवढ्यात सौन्दर्या चे वडील घरी येतात ते खूप व्यसनी दारू पिणार व्यक्ती आहे . घराचं असं वातावरण पाहून तो डुलत डुलत आई जवळ जाऊन विचारतो काई झालं की आई
कशाला बोंबलतेस काय झालं तुले सांग मले सांग लवकरात लवकर. तसच उतर देत ती म्हणते तुई बायको माझ्याशी भांडते आहे त्याला सांभाळ पाहिले तू लोकांसमोर इजत लिलाम करते माई तुई बायको .

तो खुप चिडतो व आपल्या बायकोच्या कानाखाली एक जोरानं थापड मारतो तशीच ती जमिनीवर ती जोरात पडतें. सगळे लोक पाहत राहतात व एकमेकांशी बोलू लागतात , कसा हा घर अशी कशी माणसे हाय या घराची नेहमी भांडण करत राहतात , बाप आणि मूल दोन्ही बेवडे आहे खुप दारू पितात , किती जोरानं मारलं की बायकोला लाज शरम काही नाही अशी काही बाया चर्चा करतात , असा कसा माणूस हा बेवडा कुठला.

सगळे लोक आपल्या कडे पाहून चुगल्या करीत आहे असं सासूबाईला आढळते तशीच ती म्हणते काय हाय इथे जा आपापल्या घरी निघा झाली फिल्म खतम निघा येथून आता लवकर .

खाली पडून असलेली आई उठते व आपले कपडे झटकते माती लागली असलेली साडी साफ करते व आपल्या मुलीला घेऊन रडत रडत घरात चालली जाते. तसंच ती आत गेली की हा बेवड्या म्हणतो जर माझ्या आईशी भांडण करशील तर तुई खैर नाइ लक्षात ठेव , माई आई माई जीव हाय माया आईला काही मनायचं नाय . तुले कोणी अधिकार दिला माया आईशी जबाण लढवायला  , मारून टाकीन तुले लक्षात ठेव जर यानंतर माझ्या आईशी भांडशील त माझ्या एवढा कोणी खराब नाई , कापुनच टाकतो तुले.

बस कर माया लाडक्या किती प्रेम करतोस तू मायावर बस कर बैस येथ मी तुयासाठी जेवण आणते अशी सासूबाई आपल्या लाडक्या मुलाला सांगते व जेवण घेण्यासाठी आत जाते त पाहते की जेवायला काहीच नाही आहे. फक्त पोई दोनच आहे .
काय ग जेवण का नाही बनवलस माझा सोन्या भुखेने व्याकुळ आहे . आणि तुन काहीच नाही बनवलस जेवायला चरबी चढली वाटते .

तशीच ती म्हणते नाही हो सौन्दर्या रडत होती म्हणून मी बाहेर आली होती मग हिला झोपून लवकरच जेवण बनवते की जेवण .

होका व माया सोन्या का बसून राहील तो पर्यन्त भुकेने व्याकुळ झालाय थो, तेवढ्यात बेवड्या घरात येतो काय झालं की आई काय झालं? का बरं चिडतेस एवढी .

तुझ्या बायकोनं आतापर्यंत काहीच नाही बनवलंय जेवायला. काय करावं हीच काही कळत नाही मले . मी सांगू सांगू थकले की बाबा आता तूंच सांबाळं तुया बायकोले

तसच तो चिडतो व सौन्दर्या ला तिच्या मांडीवरून उचलतो व आपल्या आई जवळ देतो आणि कमरेचा बेल्ट काढून तिला जोरा जोरानं मारायला लागतो......


लेखन-
युवी जाधव