हळद आणि हडळ - ८
हळद आणि हडळ - ८
तिकडे किर्रर्र काळोखात रात्रभर शोधूनही देवभुबाबांची भेट काही झालीच नाही. पहाट होईतोवर मंदिरामध्ये पोहोचून थकलेल्या, घाबरलेल्या, चिंतीत, व्याकुळ अवस्थेत अमृताचे बाबा देवासमोर उभे राहिले. मंदिरात कुणीतरी येण्याची चाहूल लागताच मंदिराची देखभाल करणारी एक वृद्ध आजी आवाज देतच तेथे आली. "कोण आलय तिकडे? एवढ्या पहाटे येण्याचं कारण"
अमृताच्या बाबांनी मागे वळून पाहिलं. बोलण्याची इच्छा झाली नाही. देवासमोर हात जोडून, डोळे बंद करून ते मनातच देवापुढे गाऱ्हाणे मांडू लागले. "देवा, महादेवा .... लग्न तोंडावर आलंय, त्यात हे न पेलवणारे संकट माथी मारलंय, काही चुकलं माकल आसलं तर माफ कर, पणं हे संकट लवकर परतायला हवं".
वाऱ्याची गार झुळूक मंदिरात येत होती. त्या झुळुकीबरोबरच देवासमोर लावलेला दिवा मंद मंद झुलत होता. आणि एक अस्पष्ट असा खुळखुळ्यांचा आवाज कानापर्यंत पोहोचत होता. आजी त्या काळोख्या उजेडातच चाचपत पुढे आली. अमृताच्या बाबांच्या...