...

18 views

नि:शब्द
आई व्यवसायाने शिक्षिका होती.
तसं मी तिच्याबरोबरही कमीच बोलायचो.

तिचे शेवटचे शब्द जिव्हारी लागले, ते कायमचे...
व्हेंटिलेटरवरच्या आईला तहान लागलेली असताना; मुलाला पाणी देता नं येण्याइतकी हतबलता ती कोणती?
ती शेवटची तहन लागलेली असं वाटलंच नव्हतं...
कित्येक कष्ट आणि आजार तिने याआधीही झेलले होते.
तरीही ती खंबीर होती.

पण ह्यावेळी ती ढासळली होती. तिला घरीच रहायचं होतं. तिने कधीच मला नाउमेद केलं नाही.
पण ह्यावेळी डाॅक्टरांनी फसवलं...
त्यांनी पैशाच्या मागे न लागता सरळ खोटी आशा न दाखवता सांगितलं असतं; तर ती सुखाने गेली असती.

न म्हणायला मीच शेवटची आस लावून बसलेलो व्हेंटिलेटर रूमच्या बाहेर. तिला दरवाज्याच्या काचेतून बघितलं आणि तळमजल्याला बसायला गेलो.
त्या रात्रीच तिची जगण्याची अखेरची धडपड संपली.
वाटलं, तिला लागलेली ती शेवटची तहान मला कळायला पाहीजे होती.

तिच्या वेळोवेळच्या नुसत्या सहज बोलण्यामुळे सुद्धा मी बरंच काही शिकलो आणि ते अंगिकारून आयुष्यात आजपर्यंत भलंच झालं.
तिच्या अशा जाण्यानं त्या व इतर काही अविवेकी डाॅक्टरांना सदसदविवेकबुद्धी ठेवण्याची विचारशक्ती मिळाली तरी खुप...

जग मदर्स डे साजरा करतं; तेव्हा माझ्यातलं पोरकंपण परत जागं होतं...

अशीच एक शंभरी गाठलेली प्रेमळ आई वार्धक्यानं गेल्यानंतर डोळ्यादेखत बघितली आणि तिची शेवटपर्यंत सेवा करणारी, हतबल, साठी पार केलेली, एकटीच बसून आईसाठी रडणारी, तिला अखेरचा नमस्कार करणारी मुलगीही बघितली...

पण तिच्या पवित्र देहाला उचलण्याइतपत धैर्य करोनाचा संसर्ग व मृत्यूच्या भितीपाई कुणाच शेजाऱ्यापाजाऱ्यात नव्हतं...
शेवटी बाहेरून दोन माणसं तिचा देह उचलून रुग्णवाहिकेमधून घेऊन गेली.

मला क्षणभर नि:शब्द करणारी ती आई व तिची साथ शेवटपर्यंत देणारी मुलगी, आमच्या सर्वांची सख्खं नातं नसुनही मानलेली ताई बरंच काही शिकवून, अजूनही मनात घर करून आहे.

कोण म्हणतं मनुष्याला शेवटपर्यंत कोण साथ देत नाही?
काही नाती शेवटपर्यंत साथ देतातंच...

---
#MothersDayStory
@prasad_thale