...

3 views

मौल्यवान गोष्ट..
पैसा आज आहे, उद्या नाही. पण आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत असणारी एक गोष्ट म्हणजे "आशिर्वाद".
जगात पैसा हा आवश्यक आहेच, पण त्याचा कसा वापर करायचा हे सुद्धा समजलं पाहिजे. जिथे खरंच खूप गरज आहे, तिथे पैशाचा वापर केला, तर ते उपयोगाचं आहे. ज्या वस्तू घेण्याची गरज नाही, तिथे विनाकारण खर्च का करावा? त्या पेक्षा एखाद्या गरीब मुलाला त्याच्या गरजेची वस्तू खरेदी करून दिली तर ते जास्त चांगला उपयोग असेल पैशाचा. फालतू गोष्टींवर खर्च करून फायदा तरी काय?

आज तुमच्या कडे चिक्कार पैसा आहे, पण उद्या असेल की नाही कोणाला माहित. आयुष्यात काही आपल्या नुसार घडत नाही. 'मला एक महीना फक्त सुखच मिळु दे', असं म्हटल्याने दुःख काय महिना संपण्याची वाट बघत बसतं का? नाही. दुःख, संकटे हे "बिन बुलाए मेहमान" आहेत. कधी कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल सांगता येत नाही. तुमच्या गरजेच्या वेळी हाच पैसा कामी येईल, पण तो तुम्ही जपून वापरला तरच. म्हणून पैसा जपून वापरला ते भविष्यात कामी येतो आणि एखाद्या गरिबाला मदत केली, गरजूंना हवी असलेली गोष्ट दिली तर त्यांचे आशिर्वाद मिळतात. आणि हेच आशिर्वाद, तुमच्यावर आलेल्या संकटातून तुम्हाला सुखरूप बाहेर काढतात.
तुमच्या मदतीचा हात कोणासाठी तरी पैशापेक्षा जास्त मोलाचा असतो.

© kk_jazbaat

#marathistatus #marathistory #family
#kk_jazbaat