...

7 views

लॉटरी

दिवसभर नोकरीच्या शोधात फिरून फिरून शेवटी संध्याकाळी घरी परतलो. खुर्चीत शांत बसून विचार करत होतो गेले 2 महिने नोकरी शोधतोय पण कुठेच काही होत नाही. तेव्हड्यात आईने पाणी आणून दिले. माझा पडलेला चेहेरा पाहून ती पण समजून गेली व काही न विचारता आत निघून गेली. बाबा रिटायर झाले आणि घराची जबाबदारी माझ्यावर पडली . पण चांगली नोकरी मिळतच नव्हती, घरातली आजारपण माझा संसार, ताईच लग्न सगळी तारेवरची कसरत होती. निमा माझी बायको बाळंत पणा साठी माहेरी गेलेली लग्न झाल्या पासून मी तिची कोणतीच हौस मौज केली नाही कि तिचे कोणतेच डोहाळे पुरवू शकलो नव्हतो. तशी ती खूप समजूतदार आहे पण तरीही तिला ही माझ्या कडून काही अपेक्षा असतीलच . मनात असंख्या प्रश्न येत होते.
तेव्हड्यात आई ने हाक मारली निलेश हातपाय धुवून घे. तसा उठलो आणि हात पाय धुवून पुन्हा खुर्चीत येऊन बसलो आई ने चहा नाश्ता दिला तो संपवला. बाबा ही बाहेर फिरून नुकतेच आले. त्यांनी माझी चौकशी केली व त्यांच्या हातातला पेपर मला वाचायला दिला. पेपर वाचता वाचता एक पान आल त्यावर आजच्या लॉटरी चा रिझल्ट होता अचानक आठवलं मी ही मागच्या आठवड्यात लॉटरी च तिकीट खरेदी केलेलं ताडकन उठलो आणि आतल्या रूम मधे जाऊन माझ्या बॅगेतून एक लॉटरी च तिकीट काढलं. मनातल्या मनात देवाला साकडं घालत होतो. तिकीट समोर ठेवलं आणि पेपर मधून एक एक नंबर पाहत होते 5 ही अंक सारखे आलेले आता माझ्या छातीत धडधड वाढत होती. जर मी जिंकलो तर सगळी धडपड थांबेल आयुष्यातील सगळे प्रॉब्लेम संपतील व नवीन पर्व सुरु होईल. सगळे आनंद जीवनात येतील मी पुन्हा पुढचे अंक जुळवायला लागलो छातीत धड धड चालूच होती. आणि बघतो तर काय माझा शेवटचा अंक ही जुळला.आता माझा माझ्या डोळयांवर विश्वासच बसत नव्हता मी पुन्हा पुन्हा अंक पाहू लागलो. एवढा आनंद झालेला कि काय कराव कळत नव्हत. मी जोर जोरात आई बाबांना हाक मारु लागलो आई संध्याकाळची देवपूजा करत होती आणि बाबा मी का ओरडतो हे बघायला येणार तेव्हा मीच बाहेर जाऊन बाबांना घट्ट मिठी मारली. मी लहान मुला सारखा बाबांच्या कुशीत रडत होतो त्या दोघांनाही समजत नव्हत मला काय झालं खूप वेळाने मी त्यांना सगळं सांगितलं आणि आता कोणीच कुठे कामाला जायचं नाही बजावल. मला आमचे सगळे मागचे दिवस आठवू लागले आम्ही लहान होतो तेव्हा बाबा कामाला जायचे. घराची परस्थिती बेताचीच, घरात आजी -आजोबा, काका , आत्या आणि आम्ही भावंड सगळ्यांची जबाबदारी बाबांवर होती ते एकटे किती लढणार म्हणून आई ही शिवणकाम करायची. काका च लग्न झालं तो वेगळा निघाला, आत्या च लग्न होऊन तीही सासरी गेली. आजी आजारी असायची आणि आजोबा ही अंथुरणात खिळुन. खूप कष्ट केले आई बाबांनी पण आता, संपले ते दिवस मला 10 करोड ची लॉटरी लागलेली त्याचा कधी स्वप्नातही विचार नव्हता केला. त्या दोघांना लॉटरी बद्दल संगितलं मी रडतो ते पाहून ते ही रडत होते. आणि तेव्हा अचानक माझा फोन वाजला , आईनेच उचला तिकडून निमा ची आई बोलत होती. आई ने फोन ठेवला आणी माझ्या जवळ येऊन मला कुरवाळू लागली डोक्यावरून हात फिरवू लागली आणि मला बोलली बाळा आता खरी लॉटरी लागली बर का. बाबांना आणि मला काही समजायच्या आत तीने घरातून साखर आणून आमच्या हातावर ठेवली आणि बोलली तू बाबा झालास आणि तुम्ही आजोबा. आता आम्ही तिघेही एकमेकाना घट्ट धरून बसलो होतो आणि डोळ्यात फक्त आनंदाश्रू वाहत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच आम्ही आमच्या खऱ्या लॉटरी कडे गेलो छोटुशी परी माझ्या आयुष्यात लक्ष्मिच्याच रूपात आलेली. तिला माझ्या दोन्ही हातात धरून माझी समृधि म्ह्णून छातीशी कवटाळून रडू लागलो......माझ्या बाळाच्या पायगुणाने मला कसलीच कमी नव्हती अशी ही माझी कन्या रुपी लॉटरी सगळी सुख माझ्यासाठी घेऊन आली.