...

6 views

संयुक्त महाराष्ट्र
एक मे कामगार दिन म्हणून सर्वांना मिळणाऱ्या सुट्टीनिमित्त तरी जगभरातील लोकांच्या लक्षात असतोच.

पण महाराष्ट्र दिनानिमीत्त, संयुक्त महाराष्टाची चळवळ मराठीजनांच्या कायमची लक्षात राहलीय व यापुढेही त्यासाठीचा महाराष्ट्रवासीय बंधूभगीनींचा ऐक्याचा लढा कायमच स्मरणात राहील...

भारताच्या स्वातंत्रोत्तर काळानंतरच्या तत्कालीन सरकारच्या दडपशाहीला तमाम मराठीजनांनी झुगारून संयुक्त महाराष्ट्रासाठी सविनय सत्याग्रह केला आणि १०५ जणांचं हौतात्म्य पत्करून भारताचं मराठी भाषेचं प्रतिनिधीत्व करणारं राज्य अस्तित्वात आणलं.

भारताच्यासारख्या मोठ्या देशाच्या सुव्यवस्थीत कारभारासाठी भाषावार व प्रांतवार राज्यनिर्मिती काळाची गरजच होती.
पण प्रांतीय, धर्माधर्मांमधील व भाषाभाषांमधील द्वेष नष्ट करण्याचं काम राजकारण्यांनी केलं पाहीजे; नं त्याला खतपाणी घालण्याचं...

जसं संस्थानांचं संयुक्त भारतात विलीनीकरणाचं काम तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेलांनी केलं; तसंच अखंड भारतासाठी राज्याराज्यातील व धर्माधर्मांमधील भेद मिटवून टाकण्याचं पुण्यकर्म भारतीय नेते करतील, हिच महाराष्ट्रदिना निमित्त सर्व भारतीयांना शुभेच्छा.

@prasad_thale