...

12 views

पत्रास कारण की...✍️
एकमेकांची खुशाली कळायला
कधी कधी महिना लागायचा
पण खरं सांगू तेव्हा माणूस
आपुलकीने वागायचा

जवळ आलं जग आता
मोबाईल आला इंटरनेट आलं
पण काय माहित नाय
नात्याच्या आपुलकिला काय झालं

बॅलेन्स असतो ,कॉन्टॅक्ट असतो
पण वेळच नसतो बोलायला
मनातल्या भावना आणि काळजातलं
गुपित एकमेकांनजवळ खोलायला

प्रत्येक जण ऑनलाईन असतो
मग आपल्या सोबत का नाय बोलत
१५पैशाचा जिव्हाळा आता २GB त
पण खोलत नाय
कधी कोणाला कॉल केला च तर
वाक्य ठरलेलं च
i shall call letter
massage मधेच भरलेलं च

काही काही कॉन्टॅक्ट
वर्षं नवर्षे पडून आहेत, मोबाईल च्या
आत सिमकार्डात च दडून आहेत

कॉल नाही massage नाही
misscall ही देत नाहीत
का बरं त्यांना आपली आठवण येत नाही,

कधी कधी चार ओळीचा massage तर करावा म्हणलं, काय चाललंय ,काय नाय तेवढं तर विचारावं म्हणलं

कधी कधी वाटतं जूनं
कार्ड आसायला हवं
१५पैशा तच जूनं
खुशालीचं जग दिसायला हवं

दहा ,पंधरा ओळीतच किती आणि
काय जिव्हाळा होता
१०हजाराच्या मोबाईल पेक्षा
पत्रातच लळा होता.

चला पुन्हा एकदा जुना
नात्यातला जिव्हाळा जिवंत करू
एकमेकांनची खुशाली sms करून विचारू

मिस कॉल देऊन तरी
आपुलकीची रेंज आणू
पुन्हा एकदा मायेचं कव्हरेज आणू

नात्याचा रिचार्ज संपण्याआधी
खुशाली चा टॉवर उभारू
मनातली रेंज जाण्याआधी
चला एक मेकांना फोन करू
चला एकमेकांना फोन करू

✍️अनामिका



© All Rights Reserved