...

38 views

आई....
पुन्हा कधी येशील, जवळी मला घेशील
डोक्यावरून हात फिरवत, कुशीत कवटाळशील...
नव्हती कशाची भीती, तू माय होतीस सोबती
पण आता कुठे शोधू तुला, तू नाहीस भवती.....
अंधारलेल्या माझ्या आयुष्यात, तूच होतीस पणती
का देवाने हिरावून नेले, तुला माझ्या पासुनी......
सूर्य प्रमाणे तेज तुझे, देवा सारखी माया
का पोरक करून गेलीस, तू मला एकट्याला जगाया.....
उणीव तुझी नेहमीच भासेल,
डोळ्यात पाणी नेहमीच दाटेल....
एवढ्या विनवण्या करूनही, देवास का नाही आली माझी द या
तुझ्या शिवाय जगावं कस, मन तयार नाही मानाया.....
तुझ्या विना जगण्यास काहीच अर्थ नाही
आई कुठे शोधू तुला काहीच समजत नाही......