...

12 views

तिसरं पान
सुरूवात कुठून तरी करायचीच असं मनातनं तर पक्क ठरवलं होतं...

लिहूनही नक्की कथा, कादंबरी लिहायचं, जे मला थोडंफार जमत होतं, त्यासाठी वेळही भरपूर हवा होता. पण रात्रपाळीच्या कामामुळे, शनीवार, रविवार शिवाय ते शक्य नव्हतं...

मग थोडंसं का होईना काव्य खरडायचं ठरवलं. स्वत:ला आवडलं की ते वाचकांचा अभिप्राय कळण्यासाठी writco व HIKUJAM मोबाईल अॅपवर टाकू लागलो...

हळूहळू कवितांना व लेखांना बऱ्यापैकी बऱ्यापैकी चांगले अभिप्राय येऊ लागले. त्यानं लिहायचा उत्साह खरोखर द्विगुणीत झाला.मग HIKUJAM वरील एका मित्राने WHRUTS चा instagram चा ID दिला.
त्याचं नाव आगंतुकंच राहीलं...
पण ज्या group admin नं मला त्या मराठी स्पंदनावर येतं केलं... तिला मन:पुर्वक धन्यवाद!

माझ्या एक व्यावसायीक (हौशी म्हणणं जास्त सयुक्तीक ठरेल) कवी व लेखक म्हणून पहिला प्रयत्न इंग्रजीतल्या Love Talks ह्या WHRUTS व Dishi Gala यांच्या सहयोगाने anthology पुस्तकापासून झाला.

क्रमश: ...

© Prasad Thale