...

43 views

एक सुखी संसार...
संसार म्हणजे... संसार हा दोघांचा रचलेला, मांडलेला, थटलेला, प्रकार किंवा गोष्ट किंवा पसारा किंवा खेळ... खेळच म्हणू या का आपण. ( खेळ हा काही फक्त मोडण्यासाठीच असतो असे नाही...) संसार म्हणजे फक्त आलिशान बंगला आणि चमचम करणारी घर भरून भांडी नव्हे. तर संसार म्हणजे मनाने मनाला आधार देवून तृप्त असणे. मग संसार हा झोपडीत असो किंवा उघड्यावर असो, एकमेकांना सोबत करणारा आधार देणारा आनंद म्हणजे "एक सुखी संसार" संसाररूपी खेळ हा थाटला तर संसार, समजलं तर प्रेम, मानलं तर समाधान, दिला तर आधार, जाणली तर भावना, केला तर स्पर्श, जोडले तर नाते...

एका सुखी संसाराला कवच असते विश्वासाचे ! सोबत असते आधाराची ! सुख दुःख असते दोघांचे ! मिलाप असतो भावनांचा ! हक्क असतो आपलेपणाचा !'आशिर्वाद असतो मोठ्यांचा ! किलबिलाट असतो लहानांचा ! जोड असते विचारांची ! संयम असतो वादाचा ! भाषा असते संवादाची ! इच्छा असते सहवासाची ! आकर्षण असते मनाचे ! वेळ असते हितगुजाची ! नातं असतं मैत्रीचं !
ओढ असते एकमेकांची ! सुर असतात बेधुंदीचे ! चव असते आंबट गोडाची ! गंध असतो प्रेमाचा ! रंग असतो इंद्रधनूचा ! मिलन असते तनाचे ! रूप असते समाधानाचे.........!

नातं कोणती ही असो, पण त्यात समजूतदारपणा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे... जो माणूस कोणत्याही नात्यात नाती टिकवण्यासाठी कमीपणाची भूमिका स्वीकारताना कमीपणा वाटू देत नाही तोच माणूस लायक असतो नात्यांना बांधून ठेवण्यासाठी... ( पण नात्यात विश्वासघात नसावा; तुम्ही कोणतंही नातं जोडा पण स्वार्थ आणि अविश्र्वासाने जोडू नका...)
विचार केला तर नाती टिकवण्याची जबाबदारी किंवा इच्छा किंवा भावना ही दोन्ही ही बाजूने मनापासून समान ठेवायला हवी... अगदी तसचं सुखी संसार हवा असेल, टिकवायचा असेल तर विश्वास आणि प्रेम यांना आधी स्थान हवे दोघांच्या नात्यात...
तुम्ही नातं कोणतं जोडता यापेक्षा तुम्ही नातं का जोडता माझ्यासाठी ही important गोष्ट आहे...
भावना शुद्ध ठेवून जोडलेलं नातं वाईट कधीच नसतं... निरपेक्ष, निस्वार्थ, निष्पाप, निरागस, निर्मळ, नितळ, निष्कलंक, हे भाव हवे असतात नात्यात आणि सुखी संसारात.
विश्वासाने जोडलेलं नातं कायम स्वरुपी टिकून राहतं...

{POURNIMA}🖊️