...

7 views

अदृश्य शक्ती - सत्य कि आभास


आयुष्याकडे बघण्याचा प्रत्येकाचा अंदाज किंवा दृष्टिकोन वेगळाच असतो. किंबहुना आयुष्य जगताना प्रत्येकाला येणारे वेगवेगळे अनुभव आणि सभोवतालची परिस्थितीच प्रत्येकाचे आयुष्य घडवत असते. हाताचे ठसे जसे सर्वांचेच भिन्न तसेंच सर्वांचे आयुष्य अनेक चढउतारांनी, अनेक चमत्कारिक, रहस्यमय, भीतीदायक आणि रोमांचकारी घटनांनी तर कधी अगदीच निरस घटनांनी बनलेले असते. साम्य असते ते तुरळक घटनांच्या परिणामांमध्ये. या भिन्न परिस्थितींतून, जगण्याची सवय जन्म घेते आणि ती अंगवळणी पडते. आणि मग व्यक्ती तितक्या प्रवृत्ती जन्म घेतात. कळत न कळत काही विकृतीसुध्दा प्रवृत्तीचाच भाग बनून त्या व्यक्तीचे आयुष्य घडवत असतात आणि मग सुरु होतो एक चमत्कारिक खेळ. भास-आभास, चमत्कार, श्रद्धा-अंधश्रद्धा, शक्ती आणि बरंच काही. परंतु जे घडत ते त्या व्यक्ती साठी सत्य तर इतरांसाठी असत्य हि असु शकत. कारण जे मी अनुभवतो ते माझ्यासाठी सत्यच असेल. मला येणारी अनुभूती मीच अनुभवलेली असेल. शास्त्रीय मीमांसेमध्ये त्याचे वेगळे परिमाण असतीलही परंतु ते परिमाण कोणत्या निकषांवर आधारित असतात ते फक्त आणि फक्त दृश्य घटक ठरवतात. मानवी शरीरात आणि निसर्गातही अदृश्य शक्तींचा वावर असण्याला कोणीही अस्वीकार मात्र केलेला नाही हे ही तितकच शाश्वत सत्य.
© SURYAKANT_R.J.