...

2 views

प्रेम
तुम्ही तिच्यावर प्रेम करता कारण तुम्हाला ती आवडते ,
तर हे प्रेम नाही हा तर मोह

तुम्ही तिच्यावर प्रेम करता कारण, तुम्ही तिच्या स्पर्शाशिवाय राहू शकत नाही,
तर हे प्रेम नाही ही तर वासना.

तुम्ही तिच्यावर प्रेम करता कारण तुम्ही तिला सोडू शकत नाही असा विचार करून कि ,
तिच्या भावना दुखावतील,
तर हे प्रेम नाही ही तर तडजोड.

तुम्ही तिच्यावर प्रेम करता कारण तुम्ही तिच्या पासून काही लपवत नाही,
तिला सर्व काही सांगता, तुमचे अनुभव वाटता,
तर हे प्रेम नाही ही तर मैत्री.

जर तुम्हाला तिच्या यातना कळतात, तिने न सांगता... आणि त्याचा त्रास तुम्हाला होतो.
तर हे आहे प्रेम.

जर तुमच्याकडे दुसरे आकर्षीत होतात तरीही तुम्ही तिच्या सोबत राहता ,
तर हे आहे प्रेम...!

जरी तुम्हाला तिचा स्वभाव आवडत नाही आणी तुम्ही त्याला बदलण्याचा विचारही करत नाही,
तिला जसेच्या तसे स्विकारता,
तर हे आहे प्रेम...!

जर तम्ही तुमच्या सर्व भावना तिला देता, पण तिच्याकडून तशी अपेक्षा करत नाही ,
आणी वाट आहता की, ती कधी ना कधी ना तिच्या सर्व भावना स्वत:हून सांगेल
तर हे आहे प्रेम...!

जर ती तुम्हाला सोडून जाते आणी तुम्हीही तिला अडवत नाही
सर्व लोक तुम्हाला समजवतात कि ती आता नाही येणार परत ,
पण तरी वाट पाहता शेवट पर्यत तिच्या परत येण्याची ...
तर हे आहे प्रेम