...

51 views

"गर्व वाटतो 'स्त्री' असल्याचा..."
ती, ही आणि 'मी'... म्हणजे स्त्री...!
आज मी विचार केला की, खरचं माझ्यात इतके बळ आहे... माझ्या जीवातून मी अजून एक जीव तयार करू शकते... मी एका बाळाला जन्म देऊ शकते ( अर्थातच मी एका मुलाची आई आहे ) मी जर नवीन जीव निर्माण करू शकते, तर मग मी या आयुष्यातील कोणतीही चांगली गोष्ट सहज करू शकते.

कारण आई होणं सोपं नाहीये...! आणि आई होण्याईतका जीवनात दुसरा आनंद ही नाहीये... पण त्यासाठी स्त्रीचा नवा जन्मच होतो. ती तिच्या बाळाला जन्म देत असताना, ती स्वतः मरणाच्या दारात उभी असते... किती मोठी झुंज देत असते तिच्या शरीराची आणि काळजाची... "त्याक्षणी" काही क्षणात एकीकडे तिच्यापुढे आनंदी भविष्य समोर दिसतं असतं आणि "त्याच क्षणी" ती त्या वर्तमानात मरणाशी लढत असते...
आणि मग काही क्षणातच एवढ्या मोठ्या संकटाशी सामना करून जिंकलेली "आई" असते. स्वतःच्या बाळाचा तो पहिला स्पर्श आणि आईचा बाळाला केलेला पहिला स्पर्श याने तिच्या वेदना विरून गेलेल्या असतात. आणि नवीन भविष्य तिच्या पुढ्यात उभे असते. "मातृत्वाचे"...!

ती, ही म्हणजेच 'मी' स्त्री...! किती हिम्मत दिली आहे देवाने, वेळेने आणि निसर्गाने... आलेल्या कोणत्याही वेळेला स्वीकार. हारू नकोस, आणि "तू जिंकशील आणि तू जिंकणारच आणि तू जिंकलसच..."

जन्मल्यापासून स्त्रीला बंधनं... आपण म्हणतो आजची स्त्री आधुनिक काळात जगत आहे. पण स्त्रीला बंधनं हे आहेतच. ( क्वचित एखादी स्त्री अपवाद असेल ) पण 99% 99. स्त्रियांवर पहारा असतोच. लहानपणी वडीलांची भीती ! मोठी झाली की भावाचा धाक ! लग्न झाल्यावर ती पतीचा ओरडा ! आणि म्हातारपणी मुलांचा दरारा ! तिला स्वतंत्र्य नाहीच, कुठेच नाही आणि कधीच नाही... जरी आज ती नोकरी करत असली, तरी ती मोकळा श्वास घेऊ शकत नाही... कारण तिच्या अंतरमनाला आणि जन्मल्यापासून जगत असलेल्या वर्तमानाला ही हे पक्के माहिती आहे किंवा तिने ते स्वीकारले आहे की तुला कुठे ना कुठे बंधन हे आहेच...
पण तरीही ती लढतेच...

पण ती खूप सहनशील आहे...
ती खूप समजदार आहे...
ती खूप धाडशी आहे...
ती खूप जिद्धी आहे...
ती खूप धैर्यवान आहे...
ती खूप प्रेरणादायी आहे...
ती खूप उत्साही आहे...
ती खूप स्वाभिमानी आहे...
ती खूप कष्टाळू आहे...
ती खूप प्रामाणिक आहे...
ती खूप गोष्टींचा त्याग करणारी आहे...
ती खूप गोष्टीसाठी तडजोड करणारी आहे...
ती खूप जबाबदार आणि एक संसारी स्त्री आहे...
ती किती ही संकटांशी सामना करणारी आहे...
ती अंधाराला प्रकाशाकडे नेणारी आहे...
ती आलेल्या, येत असलेल्या आणि येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीवर मात करून मार्ग काढून आयुष्य जगणारी आणि जगवणारी आहे...!
ती मुलगी आहे !
ती बहिण आहे !
ती बायको आहे !
ती आई आहे !
आणि या प्रत्येक गोष्टींच्या आधी आणि सगळ्या नात्यांच्या पूर्वी ती एक स्त्री आहे...
ती एक माणूस आहे... आणि त्याही आधी ती एक "जीव" आहे...
ती तरी ही लढतेच तिच्या अस्तित्वाची आणि आयुष्याची लढाई... आणि ती स्वतःसाठी जिंकलेलीच असते. कारण तिचा "आत्मविश्वास" तिला प्रत्येक वेळी जिंकून देतो...!🙏
"गर्व वाटतो मला मी 'स्त्री' असल्याचा..."

{POURNIMA}🖊️