...

4 views

मुलीची व्यथा
कोण आपल, कोण परक
समजत नाही .
स्वार्थी दुनियेत कुणावर
विश्वास ठेवावा कळत नाही ...😔

आपलेच आपला गळा कापतात ,
तरीही त्त्याना आपण आपलेच मानतो ..

गोड बोलल तरी म्हणतात गैरविश्वासी
वाईट बोलल तर म्हणतात संस्कार नाहीत ,
मग बोलावं तरी कसं ?

शिकलं तर म्हणतात
काय शिकून करायचय
न शिकल तर म्हणतात
अडाणी आहे
कमी शिकल तर म्हणतात
अर्ध शिक्षण उपोयोगाच नाही

खर बोलल तर म्हणतात
खर बोलून कुणाचा चांगल झालय ,
खोटं बोलल तर म्हणतात विश्ववासाच्यासाच्या
काबील नाही मग वागायचं कस

चांगल राहील तर म्हणतात
ऐट करायलीय
साधं राहील तर म्हणतात
मॉडर्न जमाना मग राहायचं कस


हसत चेहरा ठेवला तर म्हणतात
वेडी झाली काय
आणि दुःखी केला तर
म्हणतात कोण मेल्यासारखे काय बसलीय


म्हणून कोणासाठी नको स्वतःसाठी जग
स्वतः च आयुष्य, स्वतःच्या नियमानुसार जग
ना कोणाचं बंधन ,ना कोणाची अपेक्षा....

मनात आहेत वेदना दुःख
पण चेहऱ्यावर कधी
दाखवू नको
जिथं गरज पडेल तिथं .दुर्गा काली हो


राजनंदिनी लोमटे
श्री शिवाजी महाविद्यालय

© All Rights Reserved