...

12 views

संशय
*संशय*

छोटासा तीन अक्षरी शब्द.. पण कोणाचं आयुष्य पणाला लावू शकतो हाच शब्द.
ह्याला "किडा" असं ही म्हणतात. हा किडा एकदा का डोक्यात शिरला की माणसाचा इतरांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून टाकतो. माणूस मग स्वतःपेक्षा जास्त इतरांचं बोलणं खरं समजायला लागतो.. मग ते खोटं आहे हे सुद्धा लक्षात नाही येत.
सुंदर नातं जेव्हा जुळते.. ते विश्वास, आपुलकी आणि प्रेमाने घट्ट होते. पण जर हा संशयाचा किडा नात्यात आला, तर त्या नात्याला तोडल्या शिवाय शांत बसत नाही. तिसऱ्या माणसांकडून ऐकू आलेल्या गोष्टी आणि आपल्या माणसापेक्षा, तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर जेव्हा आपण विश्वास ठेवतो तेव्हा ह्या किड्याला आपल्या आयुष्यात एंट्री मिळते.
अहो, हा संशयाचा किडा कधी ना कधी मरतोच, पण तो पर्यंत एका नात्याचा शेवट होतो. एका प्रेमाचा जीव जातो. "विश्वास" ह्या शब्दावरून विश्वासच उडतो. शेवटी मात्र जेव्हा खरं खोटं केल्या जाते तेव्हा सत्य म्हणजे आपला माणूस खरा ठरतो. पण तो पर्यंत हातातून सर्व निसटून गेलेलं असते.
नातं आपलं असतं ना? मग जे काही होईल ते आपण बोलून, एकमेकांना समजून घेऊन आणि सांगून सर्व ठीक करू शकलो असतं ना?.. हेच प्रश्न मग आपल्याला घेरतात..
मला एवढंच म्हणायचं आहे, हा संशयाचा किडा आपणच आपल्या आयुष्यात आणतो. नात्यात दुरावा त्या किड्यामुळे नाही तर आपल्या मुळेच येतो. इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून नातं तोडायचं की आपल्या माणसांवर विश्वास ठेवून, नात्यात आलेल्या अडचणी आपसात शांतपणे बोलून मिटवून, आयुष्य सुखात जगायचं?... हे आपणच ठरवायचं असतं.

#marathiwriters #WritcoQuote #story #trust
#relationship #kk_jazbaat
© kk_jazbaat