...

50 views

माझ्या नवऱ्याचा वाढदिवस...😄❤️🍰
Wish You Happy Birthday Dear नवरोबा😍{ Husband }💐🎂👨‍👩‍👦

तुझ्यासाठी आज प्रथमच लिहिते, मांडते, रेखाटते आणि उतरवते शब्दातून मनातील प्रामाणिक भावना...
का लिहिले नाही सांगू का! तुला, आज पर्यंत... कारण तू माझ्या शब्दांना आज वाचशील, पण.. तू जे मला रोज क्षणाक्षणाला संसारातील प्रत्येक नात्यात आणि आयुष्यातील प्रत्येक भूमिकेत रोज रोज आणि रोज नव्याने वाचतोस अनुभवतोस... त्याची सर लिखाणातील शब्दांना नाहीये आपल्या दोघांच्या अतुट नात्यात...!🤗

माझ्या आयुष्याचा शेवटपर्यंत साथ देणारा जीवनसाथी तूच...!!! ज्याच्याशी आपण एक विधी म्हणून लग्नात सप्तपदी चालतो आणि तीच अगणित पावले आयुष्यभरासाठी दोघे ही सुख दुःखात माझ्या ( एकमेकांच्या ) साथीने चालणारा साथीदार तूच...!!!🤝

तुझ्याजवळ हक्काने रुसता येतं ! तुझ्याजवळ हट्ट करता येतो ! तुला न सांगताही माझ्या मनातील भावना समजतात ! तू माझ्या लेकराचा बाप आहेस ! तुझ्या माझ्यातली वाद हे क्षणिकच असतात ! पुन्हा संवादासाठी दोघेही आसुसलेले असतो ! ज्यासाठी आपण त्याच्या घराची लक्ष्मी असतो ! तो घरी येताच घर आनंदाने भरून येते ! जो जीवनातील संसाराचा सोबती असतो ! ज्याच्या स्पर्शाने रोमरोम भरून येते ! ज्याच्या नावाचं सौभाग्य आपण लेतो ! ज्याच्या असण्याने आपल्या असण्याला अर्थ आहे ! मी really खूप lucky आहे की मला समजून घेणारा...! माझ्यावर विश्वास ठेवणारा...! माझ्यावर अतुट प्रेम करणारा...!

असा निरागस मनाचा, निस्वार्थी स्वभावाचा, निष्पाप कृतीचा, निर्मळ भावना असणारा कणखर, रांगडा, मर्द गडी असा माझा नवरा, कारभारी, धनी, पती म्हणजेच माझ्या आयुष्याचं सर्वस्व आहे... 🙏
माझ्याकडून तुम्हाला वाढदिवसाच्या अतुलनीय, अफाट, अगणित, अविस्मरणीय आणि अनोख्या निरोगी आरोग्याचे उदंड आयुष्याच्या असंख्य शुभेच्छा... 💐💐💐❤️❤️❤️
this post is dedicated to my loving husband...🤗😍😘👍👍👍

{ तुझीच अल्लड, खट्याळ, लाडकी पूनम }
I LOVE YOU DEAR...🖊️