झाकले माणिक
*झाकले माणिक*
अशोक वनांत बगळे, कावळे, चिमण्या, मोर, कोकीळा, हंस, चातक, गरूड, पोपट, भारद्वाज, मैना, घार इ.पक्षी गुण्यागोविंदाने राहत असत. सर्वजण एकमेकांना मदत करीत असत. या सर्व पक्ष्यांचा राजा बगळा होता. त्याला त्याच्या सौंदर्याचा गर्व होता. प्रत्येक पक्ष्याला तो अपमानाने वागवत असे. कावळ्यांना तर सारखाच चिडवत असायचा. *काळा काळा कावळा, दिसतो किती घान.. आम्ही गोरे गोरे बगळे दिसतो किती छान छान* असे म्हणत. सर्वांना त्याचा खूप राग यायचा. पण तो राजा असल्याने त्याला कोणीच बोलत नसे.
कावळ्याची सर्व पक्ष्यांशी खूप घनिष्ट मैत्री होती. कावळे सर्वच पक्ष्यांना मदत करत असत. चिऊताईची आणि काऊदादाची तर मैत्री खूपच आगळीवेगळी आणि प्रसिद्ध होती. वनातील पक्ष्यांची निवडणूक जवळ येऊ लागली. यावेळेस मोर, घार, आणि बगळ्याला राजा व्हायचे होते. पण ब-याच पक्ष्यांचा तिघांनाही विरोध होता. सर्वांना काऊदादाने राजा व्हावे असे वाटत होते. कारण माणसात धूर्त न्हावी, पक्ष्यांमध्ये धूर्त कावळा, हिंस्त्र पशूत कोल्हा धूर्त असतो. सर्वानुमते काऊदादा निवडणूकीला तयार झाले. वनांत आतापर्यंत एकमतानेच राजाची निवड व्हायची. पण यावेळेस निवडणुका घेऊन राजा निवडला जाणारं होता. प्रत्येकजण आपापली मते पटवून देत होते. मोराने तर आपला सुंदर पिसारा फुलवून सर्वांचे लक्ष आपल्याकडेे वेधून घेतले. घारीने आपले लक्ष कसे चौफेर असते हे दाखवून दिले. बगळा तर स्वतःची स्तुति करून मीच कसा श्रेष्ठ आहे हे वारंवार सांगत होता. काऊदादाने आपले मत पटवून देतांना सर्व पक्ष्यांना व्यवस्थित बसवून घेतले. आणि म्हणाला,' आपल्यावर जर आपल्यापेक्षा बलाढ्य पक्ष्याने किंवा एखाद्या प्राण्याने हल्ला केला तर आपणच आपले रक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण देणार आहे. आपल्या वनाला अभयारण्याचा दर्जा मिळवून देणार, लहान पक्षी व पक्षीणींच्या संरक्षणाची जबाबदारी घेणार आहे.' सर्वांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. इ. मुद्दे मांडले. सर्वांनी टाळ्या वाजवून काऊदादाचा जयजयकार केला.
निवडणुकीचा दिवस आला. सर्वांनी मतदान केले. बहुमताने काऊदादा निवडून आले. कावळेदादा अशोकवनाचा राजा झाला. काऊदादाचा सत्कार करण्यासाठी सर्व पक्ष्यांनी एक सभा घेतली. पोपट, मैना, चातक पक्ष्यांनी काऊदादाचे खूप कौतुक केले. चिऊताई म्हणाली, 'सुरवातीला काऊदादा कामामध्ये हुशार असेल असे वाटत नव्हते. पण हळूहळू त्याने आपल्या बुद्धीची चमक दाखवावयास सुरूवात केली. तेंव्हा ते एक *झाकले माणिक* आहे. असे मला वाटते. सर्वांनी हो,हो म्हणून दुजोरा दिला. अशाप्रकारे *कावळा राजा झाला*.
तात्पर्य:-- काहीच फुशारकी न मारता कार्य करणारा गुणी मनुष्य आणि पक्षी
*लेखिका -रजनी राज अहेरराव, पुणे*