...

44 views

पहिल्या प्रेमाची दुसरी गोष्ट..







___________________________
प्रेमात असलेल्या व प्रेमात पडण्यात इच्छुक असलेल्या प्रत्येकासाठी..
___________________________




अर्पण पत्रिका
---------------
प्रेम, राग, द्वेश, हास्य..

दगड, माती, वाळू, रेती..

पाला पाचोळा, फळ, फुलं.

लिंबू, कोथिंबीर, मिरची..

तू, ती, ते.. असो..

ह्या सर्वाना समर्पित..

×-×-×-×-×-×


सारांश

ही कथा पुर्णत काल्पनिक असुन, हीचा कोणत्याही घटनेशी अथवा वास्तवाशी काही संबंध नाही, तसा आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा..

तसही अश्या गोष्टी योगायोगानेच जुळतात..

-×-×-×-×-×-


आयुष्याच्या प्रवासात खूप गोष्टी घडतात, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अनेकजण भेटतात..
खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतातही आणि सोबत असतात त्या फक्त आणि फक्त आठवणी..

ही गोष्ट आहे माझ्या प्रेमाची, सदैव सोबत असल्याची जाणीव करून देणारी "पाहताच क्षणी कोणीतरी पटकन आवडणं म्हणजे आकर्षण, आकर्षणाचं रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात.. तर प्रेमाच रूपांतर श्रद्धेत झालं की त्या प्रेमाचं नातं कायमस्वरूपी टिकणार असतं." Phone हा त्यांच्यामधील महत्वाचा दुवा बनला. प्रत्येकाचं स्वतःवर प्रचंड प्रेम असतं. पण मी ह्यावर विश्वास ठेवत नाही किंवा माझे विचार वेगळे आहेत. कारण ती माझ्या आयुष्यात आल्यावर तिने मला दाखवून दिलं की मी चुकीचा आहे. कारण माझ्यापेक्षा ही जास्त प्रेम तिने माझ्यावर केलं. तिचा मंजुळ आवाज ऐकू येईल आणि तो टिपण्यासाठी माझे कान आसुसलेले होते. अगदी हळुवारपणे श्वास घेत होतो जणू प्रत्येक...