सर्व्हे नंबर २५ - भाग 1
सर्व्हे नंबर २५
"मॅडम , आज यायला जमेल का?, सोनावळ्याच्या पुढे एक प्लॉट आहे" एजन्ट गुप्ता ने सकाळीच फोन करून विचारले.
"मी सांगते थोड्या वेळात" असं बोलून सीमंतिनीने मला फोन लावला, "आज जायला जमेल का?"
"ठीक आहे, मी दुपारी येतो" मी तिला कळवले.
दुपारी २.३० च्या सुमारास मी आणि सीमंतिनी दुचाकीने सोनावळ्याच्या पुढे जागा पाहायला जायच ठरलं. गेले ५ ते ६ महिने आम्ही जागा शोधत होतो. एखाद छोटस फार्म हाऊस असावं, वीकेंडला या रोजनिशीतून थोडं बाहेर शांत जागेत राहता यावं, झाडे लावावीत, आणि मोकळ्या स्वतःच्या जागेत आपल्या लाडक्या सिम्बासोबत मजेत वेळ घालवावा हे आमचे स्वप्न होते.
बदलापूर सोडून काही अंतरावर एरंजाडपर्यंतचा रस्ता पार केल्यावर पावसाने वाहून गेलेला रहाटोलीचा खड्डेमय रस्ता लागला. आचके गचके खात खात रहाटोली पार केली. उजव्या हाताला वळण घेतला आणि मग लागला, कॉंक्रेट ने बनवलेला नवा कोरा गुळगुळीत रस्ता. इथून पुढे प्रवासाचा आनंद घेण्यासारखा होता तो दोन्ही बाजूच्या झाडांनी व्याप्त असलेल्या प्रदेशामुळे....