हळद आणि हडळ - खंड २ - भाग १२
हळद आणि हडळ - खंड २ - भाग १२
अमृताने अवंतीकडे पाहिलं, एक स्मित हास्य केलं. अवंती खदखदून हसली. कायं असेल तिच्या हसण्यात? अमृता मात्र काहीच समजू शकली नाही. तिची थट्टा करते असा समज करून अमृताने विषय तिथेच सोडला. एका मोठ्या संकटातुन सुटल्याचा एक वेगळाच भारमुक्त आनंद अमृताच्या आई, आजी आणि बाबांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
आज मांडव पूर्ण पाहुण्यांनी गजबजला होता. हळदीच्या, लग्नाच्या गाण्यांनी परिसर दुमदुमत होता. एक एक विधी पूर्ण होता होता संध्याकाळची वेळ झाली. घराच्या एका बाजूला जेवणाची तयारी चालू झाली. स्वादिष्ट, तिखट, गोड, शाकाहारी आणि मांसाहारी पक्वानांच्या बनवण्याचा गंध सर्वत्र पसरत होता.
अंगणात स्टेज सजला होता. एका कोपऱ्यात बेन्जो साठी राखीव जागा ठेवली होती. स्टेजसमोर लाल रंगाच्या खुर्च्या रांगेत लावल्या होता. मांडवाच्या कापडाला...