'डे'विशेष
मला नेहमी कथा,कादंबरी,कविता वाचत असतांना अनेक गोष्टी विस्मयचकित करून सोडतात मग कालिदासांनी लिहिलेले शाकुंतल असो की मेघदूत किंवा अशा प्रकारची अनेक कथा काव्य किंवा नाट्यलेखन किंवा आदी प्रकारच्या जीवनाकृती असोत ज्यातून मला नेहमी वाटते आपल्याकडील लोकांनी स्त्री पुरुष संबंधला अवाजवी महत्त्व दिले ज्यामुळे येथील स्त्री-पुरुषांचे सामर्थ्य हे केवळ प्रेम शोधण्यात व लैंगिक लढण्यातच मोठ्या प्रमाणात खर्ची पडले आणि परत या लोकांची प्रेमाकडे आणि लैंगिकतेकडे चारित्र्याच्या चौकटीतून पाहण्याची दृष्टी ज्यामुळे साध्या नैसर्गिक गोष्टीही ह्या लोकांनी खूप क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या करुन ठेवल्यात ते काही मनाला पटत नाही की, रुचत नाही.हे म्हणजे असं झालं बघा तहानलेल्या माणसाने गोड सरोवराकडे पाठ करून पाहण्यासाठीचा आकांत करावा असे. मुळात मला हेच पटत नाही की ज्या देशात वात्सायनासारखा कलाप्रेमी घडून गेला,ज्या देशात त्यांच्या मंदिरावरती स्त्री-पुरुषांच्या कामभावनांचे अगदी उघडपणे चित्रणं केले गेले. अशा कला संपन्नतेने नटलेल्या देशात या गोष्टीला असे विकृत आणि अवाजवी स्वरूप का आले असावे? कारण या देशातील संस्कृतीमध्ये स्त्री-पुरुष मैत्रीच मान्य नाही. ज्या संस्कृतीमध्ये स्त्री-पुरुष केवळ प्रजोत्पादन करण्यासाठी जवळ आलेली माणसं मानल्या जातात त्या देशात स्त्री-पुरुषात मैत्री होऊ शकते ही संकल्पना गळी उतरण्यास सारखी नाहीच आहे.त्यामुळे या अशा प्रकारची 'डे' कितपत साजरे केले जाऊ शकतात.हा मला पडलेला नेहमीचा प्रश्न आहे.. *-जया शिंदे*