...

6 views

लिहायचं कशाला?
नमस्कार माझे प्रिय वाचक मित्रहो!
आज मी एक नवा विषय घेऊन पुन्हा उपस्थित झाली आहे. ते म्हणजे लिहावं कशासाठी?
मग ती कविता असो गोष्ट असो वा एखादा लेख असो. काही महिन्यांपूर्वीच तुम्हाला माहीतच असेल की माझा पहिला कविता संग्रह ' स्वप्नांचे शहर माझे ' हे प्रसिद्ध झालं. माझा आनंद गगनात मावेनासा होता. परंतु त्याच दरम्यान माझ्या कानी एक शब्द पडले ते म्हणजे मला एक व्यक्ती बोलली '' अरे ही कविता वगैरे लिहून काय होणार आहे, उगाच वेळ कशाला वाया घालवते? पैसा मिळेल असा काहीतरी काम कर. " खरं सांगू मला या गोष्टीचा राग नाही आला पण दुःख खूप झालं. कारण लेखणीची ताकद माहीत नसणे हे समजाच दुर्दैव म्हणावे! मी त्यांच्या या प्रश्नाचा प्रतिउत्तर न देता नुसते स्मित करून पुढे चालते झाले., याला बरेच कारण होते पाहिलं हे म्हणजे की त्यांना लेखिनीचे महत्त्व पटवून देणं इतकं सोपं नाही, आणि बोलून दाखवण्या पेक्षा प्रत्यक्ष करून दाखवणं हे कधी ही चांगल पण ते ही सोपं नसत. मित्रांनो त्या दिवसापासून मी गूढ विचार करत राहिले की नक्की करायचं काय? "पैसा मिळेल असे काही काम कर" हे वाक्य तर मला मुळीच पटलं नाही कारण, आपण सर्व कामे पैसा मिळवण्या साठीच का करावं?
स्वार्थ असेल तिथेच का जावं?
हो मान्य आहे आत्ताच्या काळात पैशाला महत्त्व आहे पण पैसा सर्वस्व आहे का? या समजाला कोणी सागितलं की कवितेने, गोष्टीने, थोडक्यात लेखणीने काहीच कमावता येत नाही? लेखणी म्हणजे शून्य आहे हे कोणी सांगितलं? लेखणी सर्वस्व कमवून देते, पैशाबरोबर ती सन्मान, जगामध्ये एक महान व्यक्तिमत्त्व घडवण्याचं काम करते,यश मिळवून देते, एक नवी ओळख देते. मला एकाच प्रश्नाचं उत्तर द्या की या जगातील सर्वजण काही ना काही होऊ इच्छितो. यश मिळवू इच्छितो, प्रसिध्द होऊ पाहतो.कोणाला डॉक्टर, इंजिनिअर, आर्टिस्ट, आर्किटेक्चर, शिक्षक, वैज्ञानिक, आदि व्हायचं असतं. एकदा तरी कोण म्हणत का मला कवयित्री व्हायचय? कवी व्हायचय? लेखक व्हायचय? असं ही नाही की कोणीच होऊ इच्छित नसत पण त्यांच्यासमोर बरेच प्रश्न असतात की लेखक होऊन काय मिळणार? का खरचं मी हे करू शकणार? माझं भविष्य कसं असेल? असे बरेच प्रश्न त्यांना अडवतात, पण खरं सांगू लेखक कोणी होत नसतं ती निसर्गाची एक दुर्मिळ, अनमोल अशी देणगी असते जी सर्वांच्या हातात येत नाही. याचा अर्थ हे नाही की मी स्वतः ला महान म्हणत आहे किंवा इतरांना तुच्छ लेखत आहे. जे ते आप आपल्या क्षमते नुसार परिनुसार कार्यरत असतं. म्हणतात ना की प्रत्येक जण वेगवेगळया उद्देशाने जगात जन्माला आलेला असतो, आणि तो व्यवस्थित पणे पार ही पाडतो. मुद्दा हाच आहे की लेखक सुद्धा या जगासाठी बरच काही करत असतात. लेखकांनी त्यांचे नाव उंचावर पोहचवले आहे, जगाच्या इतिहासात त्यांचे नाव उमटवली आहेत. ती वेडी म्हणून नाही हो! लेखिनीची ताकद या जगाला पटवून द्यायचा काम हे आपल्या सर्वांना एकजूट होऊन करायचं आहे. शेवटी एवढं म्हणेल कविता असेल तरच भावनेला आकार देता येईल, शब्द असेल तर स्वतः ला व्यक्त होता येईल या जगात कोठेतरी नावीन्य ओळख निर्माण करता येईल. कारण तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल त्यासाठी प्रथम अभ्यास करणे महत्त्वाचे असते मग आपण अभ्यास कसा करतो? पुस्तकेच वाचतो न? त्यांचाच अभ्यास करतो ना? तेच मार्ग दाखवतात की नाही? त्या पुस्तकाला सुद्धा कोणीतरी लिहिलं आहे, तो एक लेखकच असेल न? मग जर एक पुस्तक लिहिणार तुमचं संपूर्ण भविष्य घडवू शकतो तर तो महान कसा नाही? त्याने कसं काहीच कमावलं नाही? या समाजाला लेखणीची ताकद कळणे फार गरजेचे आहे. लेखणी तर सर्वस्व आहे ती कधीच खोटं बोलत नाही. तिच्या एका एका शब्दाला किंमत आहे. लेखक तर अनमोलच आहे कारण त्याचं मूळ म्हणजे लेखक! जगाला मार्गदर्शनासाठी लेखकाची गरज भासते. त्याशिवाय जग चालूच शकत नाही. अख्खे जग हे ज्ञानाच्या आधारे सुरळीत सुरू आहे.
माझ्या या लेखात काही चुकले असेल तुमचे मन दुखावले असेल तर कृपया क्षमा असावी.🙂
©Vanshika Chaubey
© All Rights Reserved