...

20 views

गुलाब
आई गेली आणि घर शांत झालं घरातली लक्ष्मीच निघून गेली. रोज छोट्या छोट्या आठवणी निघू लागल्या तशीच एक आठवण लहान पणी आई एक गोष्ट सांगायची तीच आज मी पुन्हा सांगते...
एक लहान मुलगा असतो 9-10 वर्षांचा सोनू नावाचा त्याची आई खूप आजारी असते खूप दिवस झाले तरी तिच्यात काहीच सुधारणा नाही शेवटी एक दिवस ती आपल्या मुलाला बोलावते आणि त्याच्या हातात एक गुलाबाचं झाड देते, सांगते बाळा मी देवा घरी चालले आहे पण तू घाबरू नको हे झाड घे मी तुला भेटायला येत जाईन आणि एवढं बोलून ती आई प्राण सोडते. थोड्या च दिवसांनी सोनूचे बाबा सोनू ला दुसरी आई आणतात. सोनूला वाटत ही पण आई आपल्या आई प्रमाणे जीव लावेल पण होत उलटच ही आई सोनूला रागवायची मारायची उपाशी ठेवायची सोनू खूप रडायचं त्याचे बाबा कामा निमित्त बाहेर गावी जायचे सावत्र आई सोनू कडून सगळी काम करून घ्यायची. एक दिवस असच सावत्र आई ने सोनूला खूप मारलं लहान सोनू रडत रडत बाहेर गेला आणि आपल्या आईने दिलेल्या गुलाबाच्या झाडाजवळ जाऊन जोर जोरात रडू लागला.त्या गुलाबाच्या झाडाला गुलाबाचं फुल आलेलं त्यातून आवाज आला सोनू बाळा रडू नकोस मी आले आहे सोनू ने पाहिलं तर काय फुलातून आई बोलतेय मग रोजच सोनू त्या फुला सोबत बोलायचं हसायचा गप्पा मारायचा असं करता करता बरेच दिवस गेले. एक दिवस सोनूच्या सावत्र आई ने पाहिलं आणि तिने रागात ते झाड उपटून टाकलं. बिचारा सोनू पुन्हा एकटा पडला आता आई च भेटणं बंद झालं परंतु आता त्याच्या जवळ आई च्या खूप साऱ्या आठवणी आणि शिकवणी होत्या सोनू जिद्दीने खूप शिकला आणि मोठा झाला.
आई... ची जागा कोणीच घेऊ शकत नाही...