"नातं"
कमळाच्या पानावर पाण्याचा थेंब पडावा आणि ते क्षणार्धात ओघळून जावं तसं आपलं बालपण,बघता बघता हातातून निसटून गेलं.सततचा दुष्काळ आणि नापिकी असं असतानाही आई-बाबांनी आपल्यावर भरभरून माया केली.काळा प्रमाणे आपणही मोठे होत होतो.तुला आठवतं भावड्या, बाबा तुला श्वास म्हणायचे आणि मला प्राण तेव्हा मी त्यांच्यावर रागवायचे आणि म्हणायचे बाबा 'काळ बदलला पण मुलगी दुय्यमच नं? बाबा यावर काहीच बोलायचे नाही फक्त माझ्याकडे पाहत राहायचे.बघता बघता हे सारं संपून गेलं अन बाबाही गेले.काळा प्रमाणं तू ही बदललास.ज्या वेळी तू माझ्या पाठीशी खंबीरपणे 'उभा' राहायला हवा होतास तेव्हा तुही 'इतरांसारखाच' वागला,असो.. बाबांनी जाताना माझ्याकडून एक वचन घेतलं होतं 'राजा' कोणत्याही काळात कसाही वागला तरी तू त्याचा हात सोडायचा नाहीस.आयुष्यात बाबांनी पहिल्यांदाच मला काहीतरी मागितलं होतं आणि एका कर्णाला,मी देणार तरी काय? त्यांच्या हातात हात दिला त्या वचनाला मी बांधील आहे. "आज तुझा 'वाढदिवस' तुला 'उदंड' आयुष्य लाभो"आणि आई बाबांचा आशिर्वाद कायम आपल्या पाठीशी आहेच.'जन्मदिवसाच्या'तुला खूप खूप शुभेच्छा..🎂🎂💐💐😊...."बाबांची खूप आठवण येते"