...

2 views

लेकी साऊंच्या
'सावित्रीमाई ही स्त्री-पुरुष समानतेची विचारसरणी असणारी पहिली स्त्री होती की,जिने स्त्री - पुरुष समानतेवर विचार करुण काम करायला सुरुवात केलेली आहे.स्त्री आणि पुरुष समान पाहिजेत असा विचार आत्ता लोकांच्या मनात रुजू लागला पण हे स्वप्न सावित्रीमाईंनी पाहिले आणि ती समानतेची ज्योत तेवत ठेवण्याचे काम सातत्याने केले.केवळ म.फुलेंनी तिला शिक्षणास प्रवृत केले आणि पति आज्ञा म्हणून माईंनी त्यांना साद दिली असे नाही तर तिच्या मनात हा शिक्षणाचा ध्यास चिरंतन वाहत होता त्याला फक्त प्रत्यक्षात आणण्यास म.फुलेंनी प्रोत्साहन दिले आणि तिने गगनाला मुठीत घेण्यास सुरुवात केली त्या निरंतर शिकत राहिल्या कारण शिक्षण म्हणजे केवळ अक्षर गिरवणे किंवा अक्षर शिकवणे नाही तर ती सहज साध्य होणारी सोपी गोष्ट आहे पण अक्षर गिरवता गिरवता त्यांना स्वयंपूर्ण कसं करता येईल हा विचार बाळगून त्या प्रकारचं प्रशिक्षण देण्याच काम जाणिवपूर्वक 'साऊंंनी त्या काळात'केलं या तिच्या अफाट विचारशक्तीला आणि कार्याला आम्हा लेकींचा सलाम..🙏🏻🙏🏻 प्रा.जया शिंदे(मराठी विभाग)के.टी.एच.एम. महाविद्यालय नाशिक