...

8 views

भूतकाळ......
आज सकाळी गावाकडून फोन आला होता.. आजी ची तब्बेत खूप खालावली म्हणून बोलवणे आले.. आज आजी ला भेटून तीन वर्षे निघून गेली होती.
.
.

लहानपाणी आमचे बालपण चे खोडकर उन्हाळे आजी कडेच जायचे..
रोज पहाटे सहा ला उठायचं डोळे मिचकावत हातावर कोलश्याची भुकटी घ्यायची आणि बाहेर येऊन थंड हवेचं झोक चेहऱ्यावर जाणवायचे आणि दात घासायाचे.. तोवर आजी चुली वर गरम पाणी उकडत ठेवायची.. मग आजी गरम पाणी आम्हाला तोंड धुण्यासाठी द्यायची. आम्ही पण छान पैकी तोंड धुवून स्वयंपाक घरात आजी जवळ येऊन बसायचो मग आजी गरम गरम दूध आम्हाला द्यायची.. आम्हा सर्व भावांडात दूध पिण्याची शर्त लावायचो आणि फूँकर मारत दूध प्यायचो.
मग दूध पिऊन झाले की आम्हा सर्व भावंडाचे आंघोळीसाठी भांडणे व्हायची.बाहेरच्या चुलीवर ती आजी पाणी उकळत ठेवायचे.आणि आम्ही सर्वे एका मागून एक पटापट आंघोळी उरकून बाहेर पडायचो.
एकदा आम्ही बच्चे कंपनी घराबाहेर पडलो ची दुपारी बारा वाजे नंतरच घरी परतायचो.
आम्ही सर्व गल्लीतील बच्चे कंपनी संपूर्ण गल्लीमध्ये धुमाकूळ घालायचं घराच्या मागच्या बाजूला मोठे पटांगण होते...
आणि त्या पटांगणात भलेमोठे वडाचे झाड होते वडाच्या झाडाला अशा पारंब्या लटकतात त्यावर आणि खूप मस्ती करायचो झोके झुलायाला खूप मजा यायची. कडक उन्हात तहान भूक विसरून खेळण्यांमध्ये रमायचं बस आज आमचा रोजचा दिनक्रम....
अचानक गाडीला ब्रेक लागला आणि माझ्या भूतकाळातील विचारांमधून बाहेर पडलो....
गावाच्या फाट्याजवळ गाडी थांबली होती. फाट्यावर मामा माझी वाट बघत उभे होते. गाडीतून उतरता बरोबर ते माझ्याजवळ आले माझ्या हातातील बैग घेऊन त्यांनी मला एक करकचून मिठी मारली.....

क्रमश......



© pallavi_dhade