...

9 views

माणसं
माणसं ।।

मनात असंख्य वेळा मरनाचे विचार घोळतात,अस्वस्थ व्हायला होत मग कुठेच मन लागत नाही अशा वेळी मी घाटी हाॅस्पीटलला पायीच फेरफटका मारायला जात असते असच झाल त्या दिवसी डोक्यात भिरभिरनारे विचार अन सैरावेरा झालेल मन याचा काही केल्या ताळमेळ बसेना म्हणून मी तसीच बेगमपूर्यातुन मकाई गेट व तेथुन अर्ध्या तुटलेल्या भिंतीमधुन दवाखान्याच्या आतल्या भागात प्रवेशले,तेथे खूपसारी माणसे जगण्याच्या ओढीने त्यांच्या संकटावर मात करुन पुन्हा नव्याने जगायचा प्रयत्न करतात त्यांची ही जिद्द ,चिकाटी मनाला उभारी देऊन जाते आणि म्हणूनच की काय मी या वातावरनात पुन्हा पुन्हा मला शोधत असते. अशातच एक दुश्य मनाला बोचुन गेलं त्याची सल उरात आत कोठेतरी होत होती,कोणती? काय? असे बरेच प्रश्न तुमच्या मनात आले असतील नाही का? तर ऐका मी सकाळी असेच निघाले होते त्या आवारात आल्यावर काही कठड्यावर तर काही चक्क खाली रस्त्यावर माणसे बसली होती,तीही त्या कठड्यावर आपल्या कुपोषीत बाळाला छातीशी धरुन दुध पाजत होती कृश हडकुळी मळकट जुनेर घातलेली एक आई ,एक बाई हे वात्सल्याचे दुश्य बरेच येनारे जानारे क्षण एक क्षण कटाक्ष टाकुन निघुन जात होती मी पण क्षणभर घुटमळले माझी नजरही तिच्यावर आणि त्या कुपोषीत बाळावर गेली,तसाच एक स्वत:ला सभ्य सुसंस्कुत समजणारा म्हणजेच दिसणारा मध्यम वयाचा दुचाकीस्वार थांबला व तिच्या त्या उघड्या मांसल भागाला लोचट नजरेने पाहु लागला मी त्याच्याकडे पाहुन जवळजवळ ओरडलेच हरानखोरा,लहानपनी कधी आईच्या छातीला बिलगुन दुध प्यायलाच नाही का? ती बाईपेक्षा एक आई आहे वात्सल्याने ओथंबलेली पण तू छी.. हे बोलताच त्याची मान शरमेने खाली गेली व तो चालता झाला.पण माझे हे बोलने ऐकुन आजुबाजुची ४/५ गरिब पापभिरु माणसे जमा झालीत. त्यातला एक जख्ख म्हातारा मला म्हणाला 'जाऊ दे पोरी हे रोजचच ही चांगल्या कपड्यातील माणसे भिकारी निराधार बाईलं त सोडत नाहीत मग ही तर त्याच्यापेक्षा बरी तं आहे. ततक्षणी रस्त्याच्याकडेला पडलेल्या एका अर्धनग्न वेड्या भिकारनीचा वेदनेने व्यापलेला चेहरा माझ्या डोळ्या समोर आला अन अंगावरुन एक सरारुन काटा आला, म्हातारा पुन्हा बोलु लागला 'चांगली दिसणारी माणसेच अशी वागतात पोरी,गरीबाला कुठ ऐवढा येळ असतो ? एका भाकरीच्या तुकड्यामागं पळण्यात आमचं उभ आयुष्य गेलं,दिवसभर राबणार तव्हा कुठ चार घास मिळणार ना घर ना दार असं उघड्यावर कुत्र्या मांजरासारख जगायच मग सांग गरीबाला कसली आली लाज आन आब्रू असं म्हणून तो कचरा अन प्लास्टीक जमा करायला हसत हसतच निघुन गेला.बाकी माणसंपण आपआपल्या कामात गुंतरी.मी हाॅस्टेलकडे यायला निघाले पण प्रश्नांचा गुंता अधिकच वाढला होता.
अनुभव कथन-जया शिंदे(विद्यापीठ परिसर,औरंगाबाद)
© भद्रकाली