*" जिद्दी कोण, मुलगा की वडील "*?
एक सुदंर बोधकथा.
( निवांत असाल, तेंव्हा नक्की वाचा )
*" आई, बाबा... माझा रिझल्ट आलाय. मी फर्स्ट क्लासने पास झालोय .. " वेद पेढ्यांचा बॉक्स घेऊनच आला होता.*
*" देवाजवळ ठेव पेढे, आणि आशिर्वाद घे आधी. शेवटी तू तुझं स्वप्न पूर्ण केलसंच . आम्हाला आधी नव्हता आवडला तुझा हा हॉटेल मॅनेजमेंटला अॅडमिशन घेण्याचा निर्णय! पण तू तुझ्या निर्णयावर अढळ राहिलास आणि ते चांगल्या मार्कांनी पूर्ण केलेस."*
*" बाबा नमस्कार करतो... "*
*" यशस्वी हो! आता पुढे काय ठरवलंय? "*
*" बाबा, आपली थोडी जमीन आहे ना हायवे ला लागून, मी आणि माझे दोन मित्र मिळून तिथे हॉटेल सुरू करणार आहोत. आधी थोडेसेच, कामापुरते बांधकाम करून घेऊ, नंतर जसा जम बसेल तसं हळू-हळू वाढवू हॉटेल."*
*" वेद, अरे ती जमीन तर बँकेकडे गहाण आहे. तिथे काही करू शकत नाही आपण. तू एखाद्या मोठय़ा हॉटेलमध्ये नोकरी बघ ना आधी."*
*" बाबा, जमीन गहाण आहे ? मला का सांगितलं नाही तुम्ही ?* *आणि गहाण कशाला टाकली जमीन ? तुम्हाला माहीत होतं ना मला हॉटेल टाकायचं होतं तिथे. नोकरी तर मी कधीच करणार नाही, मला बिझिनेस करायचा आहे.*
*बरं, आपल्याकडे किती पैसे आहेत? आपण भाड्याने घेऊ जागा."*
*" अरे बाळा, पैसे असते तर जमीन गहाणच कशाला टाकली असती ? तुझ्या कॉलेजची फी, हॉस्टेलचा खर्च, घरखर्च, माझ्या पेंशनमध्ये थोडाच भागणार होता ? तू दुसरा काहीतरी मार्ग शोध. "*
*वेदला बाबांचा फार राग आला. त्याच्या माहितीप्रमाणे त्यांची परिस्थिती इतकी काही बिकट नव्हती की, त्यांना जमीन गहाण टाकावी लागेल माझ्या शिक्षणासाठी. आणि आता पैशांची मदतही करणार नाही असं म्हणताहेत. " कसे आई-वडील आहेत ? मुलासाठी काहीच करू शकत नाही! "*
*वेद त्या दिवशी जेवलाच नाही, दुसर्या दिवसापासून सकाळीच घराबाहेर पडायचा तो रात्रीच घरी यायचा. कुठे जातो, काय करतो याची आई बाबांना...