...

5 views

होलिका
काल आपण होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला पण या मागची कथाही आपल्याला कळायला हवी जी आजच्या परिस्थितीला साजेशी आहे.
होलिका ही हिरण्यकश्यपाची बहिण एक विद्रोही बंडखोर स्त्री जी विष्णूची विरोधक म्हणजेच आर्याची विरोधक हा विष्णू प्रत्येक काळात बदत गेला मग कधी तो वामन म्हणून तर कधी राम म्हणून (तर आता योगी मोदी शहा)अश्या प्रकारे.तर ती ह्या विष्णूची संस्कृती नाकारणारी स्त्री होती.
हा विष्णू कोण हा तोच आहे ज्याने अनूसयेचं शिल भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला,हा तोच विष्णू ज्याने कपटाने तुळसीचंही(वृदेचं)शिल भ्रष्ट केलं पुढे तिने स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केली.अशा विष्णूचा होलिका विरोध करत होती म्हणून त्या वेळीच्या प्रस्थापितांनी एक मिथक तयार केलं की ती प्रल्हादाला चितेवर घेऊन बसली व त्यात ती जळाली पण प्रल्हाद नाही हे कसं शक्य आहे कारण जाळने हा अग्णीचा धर्म आहे मग त्यात प्रल्हाद नावाचा हाडामासाचा देह वाचतो कसा?हे पटतं नाही तर त्यांना होलिकेलाच मारायचे होते व त्यांनी ते केलेही तिला जबरदस्तीने जाळलं गेलं या ठिकाणी खरे तर स्त्रीचा खूप मोठा अपमान केला गेला.
पण त्याची आठवण राहावी म्हणून हा होळी सण.काय कमाल आहे आपण गेली कित्येक वर्ष कुणाला जिवंत दहन करण्याचा उत्सव साजरा करत आहोत.माणूस म्हणून आपण किती संकूचित होत चाललोय याचं हे उदाहरण आहे.....

—जया शिंदे